१६ ऑगस्ट रोजी राज ठाकरे पनवेलमध्ये

‘मनसेे'तर्फे गोवा महामार्गासाठी ‘निर्धार मेळावा'चे आयोजन

नवीन पनवेल : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या वतीने येत्या १६ ऑगस्ट रोजी पनवेल मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती ‘मनसे'चे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनसेच्या अदिती सोनार, अतुल चव्हाण, पराग बालड, केसरीनाथ पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

कोकणासाठी आवश्यक असलेला मुंबई-गोवा महामार्ग राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे गेली १७ वर्षे रखडलेला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गातील एवूÀण १९ आमदारांपैकी जवळपास १५ आमदार आणि ४ खासदारांपैकी ३ खासदार आज सत्तेत आहेत. जे आज सत्तेत नाहीत ते वर्षभरापूर्वी सत्तेतच होते. तरीही यांच्या अनास्थेमुळे या रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर आजपर्यंत हजाराेंच्यावर कोकणवासियांचा अपघातात बळी गेलेला आहे. सदरचे दुष्टचक्र कुठेतरी थांबवणे आवश्यक आहे. म्हणूनच राज ठाकरे यांच्या
उपस्थितीत पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता ‘निर्धार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ‘मनसे'चे पनवेल महानगर शहराध्यक्ष योगेश चिले यांनी केले आहे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ऐरोली विधानसभा क्षेत्रमध्ये तिरंगा बाईक रॅली