पनवेलमध्ये गर्दीच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून पनवेल मधील सीसीटीव्ही कंट्रोल रुमची पाहणी

 पनवेल :  पनवेलकर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पनवेल शहर पोलीस ठाणेच्या वतीने गर्दीच्या आणि महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सदर कॅमेरे कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यवत केले.

पनवेल शहर पोलीस ठाणे येथे भेट देऊन आ. प्रशांत ठाकूर यांनी तेथील सीसीटीव्ही कंट्रोल रुमची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधतला. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत उमेश इनामदार, प्रकाश खैरे तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी सद्यस्थितीत बसवण्यात आलेल्या ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि त्यांचा कंट्रोल रुम पनवेल शहर पोलीस ठाणे येथे नैमुद्दीन शेख (रिंटू) सीसीटीव्ही टेक्निशयन यांच्या माध्यमातून बसवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच आधुनिक पध्दतीने या वॉर रुममध्ये आगामी काळात स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास किंवा कोणती दुर्घटना घडल्यास या कंट्रोल मधूनच स्पीकरच्या माध्यमातून पोलिसांना मार्गदर्शन करणे शवय होणार आहे. सदरचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पनवेलमध्ये राबवला जाणार असल्याचेही नितीन ठाकरे म्हणाले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदर सीसीटिव्ही कंट्रोल रुमची पाहणी केली. शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, सराफ बाजार, मिरची गल्ली, आदि ठिकाणच्या वाहतूक कोंडी संदर्भात सुध्दा चर्चा झाली. तसेच लवकरच वाहतूक पोलीस  अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी सणासुदीच्या काळामध्ये शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करणार असल्याचे आ. प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पनवेल शहरात अजुनही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याने यासंदर्भात सुध्दा आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन आमदार ठाकूर यांनी यावेळी दिले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

१६ ऑगस्ट रोजी राज ठाकरे पनवेलमध्ये