उपोषण आंदोलनानंतर महापालिकेला जाग

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मध्यस्थी, आयुवतांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे - रविंद्र सावंत

नवी मुंबई : वारंवार महापालिकेला निवेदने देवून, शिष्टमंडळ नेवून, चर्चा करुनही आश्वासनाशिवाय पदरात काहीही पडले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह अन्य समस्या सोडविण्यासाठी इंटक संलग्न ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या माध्यमातून कामगार नेते रविंद्र सावंत यांनी परंतु, ऑगस्ट क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयलगतच कामगारांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले. परंतु, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आली. यानंतर महापालिका प्रशासनाने ३१ ऑगस्ट पर्यत कामगारांची वेतनवाढ करण्याचे मान्य केल्यामुळे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी महापालिका विरोधात सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिली.

दरम्यान, सदर उपोषण आंदोलनावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून ठोक मानधनावरील कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी आयुवत नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांना देखील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचे आश्वासन दिले आहे.

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनावाढीसह अन्य समस्या सोडविण्यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी ऑगस्ट क्रांतीदिनी ९ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयालगत बेमुदत उपोषण आंदोलनास सुरुवात केली. यावेळी सुरुवातीपासून ३०० ते ३५० कर्मचारीही बेमुदत उपोषणास बसले. कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी कार्यक्रमात भाषणातून आपल्यावर होत असलेला अन्याय, असुविधा, कमी वेतनात होत असलेले शोषण याचा पाढा वाचला. यावेळी उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यादरम्यान अनेकदा पावसाचा अडथळा येवूनही आंदोलनकर्ते कर्मचारी पावसातही रस्त्यावर बसूनच होते.

सदर उपोषण आंदोलनस्थळी दिवसभरात नवी मुंबईकरांनीही मोठ्या संख्येने भेट देऊन आंदोलनाला समर्थन दिले. यानंतर सायंकाळी आंदोलन स्थळी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रशासन उपायुक्त आणि शिक्षण विभाग यांनी भेट देऊन शिष्टमंडळाला चर्चेसाठी अतिरक्त आयुक्तांच्या दालनात बोलविले.  त्यानुसार चर्चेसाठी कामगारांच्या वतीने कामगार नेते तथा ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रविंद्र सावंत, ‘काँग्रेस'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर अविनाश लाड, ‘काँग्रेस'चे प्रदेश पदाधिकारी अंकुश सोनवणे, वाहन विभागाचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, ‘महाराष्ट्र कामगार कंत्राटी कामगार सेल'चे अध्यक्ष संजय सुतार, ‘युनियन'चे सचिव मंगेश गायकवाड तसेच प्रत्येक विभागातील एक कामगार प्रतिनिधी तर प्रशासनाच्या वतीने उपायुक्त प्रशासन शरद पवार, उपायुक्त शिक्षण विभाग घनवट आणि अतिरिक्त आयुक्त मासाळ सहभागी झाले होते. अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात एक तास चर्चा झाली.

यावेळी शिष्टमंडळाची महापालिका प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत ठोक मानधनावरी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि अन्य समस्या निवारणासाठी विशेष एक समिती नेमण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ कशाप्रकारे करता येईल, याबाबत सदर समिती ३१ ऑगस्ट पर्यत महापालिका आयुक्तांना अहवाल देणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रशासन लवकरच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर सकारात्मक निर्णय घेण्यात असल्याने उपोषण आंदोलन स्थगित करण्याची विनंती उपायुवत शरद पवार यांनी यावेळी केली.

बैठकीत आम्ही प्रशासनाने दोन महिन्यापूर्वी २२ कर्मचाऱ्यांना थेट ३५ हजार रुपये पगारवाढ कोणत्या निकषावर केली याबाबत प्रश्न उपस्थित करत ठोक मानधनावरील सर्वच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. याशिवाय त्यांनी लिपीक टंकलेखक, परिवहन कर्मचारी, आदिंच्याही समस्या मांडल्या. त्यावर आयुवत राजेश नार्वेकर यांनी भ्रमणध्वनी वरुन चर्चा करत सर्व सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित केले -रविंद्र सावंत, कामगार नेते तथा अध्यक्ष-इंटक, नवी मुंबई. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘आप'तर्फे दिघा विभाग कार्यालयावर मोर्चा