‘शिवसेना'तर्फे सीवुडस्‌ मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

चांगल्या शिक्षणाबरोबर चांगल्या संस्काराची जोड असायला हवी - विठ्ठमोरे


नवी मुंबई : ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'च्या सीवुडस्‌ विभाग तर्फे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता दहावी आणि बारावी, पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ‘शिवसेना'चे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सुमित्र कडू, उपशहरप्रमुख गणेश घाग, कौस्तुभ मोरे, विभागप्रमुख मिलिंद भोईर, अरुण गुरव, हरिश्चंद्र फल, माजी मुख्याध्यापक पांडुरंग केंगार, इंगावले काका, कार्यक्रमाचे आयोजक विभागप्रमुख विशाल विचारे, आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्याला चांगल्या शिक्षणाबरोबर चांगल्या संस्काराची जोड असायला हवी, असे विठ्ठल मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागप्रमुख राजेश घाडगे, शाखाप्रमुख विनायक पुकाळे, माजी शाखाप्रमुख नितीन पवार, उपशाखाप्रमुख रवींद्र देसाई, गटप्रमुख केतन गुरव, युवासेना विभाग अधिकारी प्रतिक कवडे, अक्षय दळवी, अभिषेक सावंत, अमोल जेथे, सामंत साहेब, संतोष साळवी, खेडेकर काका, सावंत साहेब, आदिंनी विशेष मेहनत घेतली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उपोषण आंदोलनानंतर महापालिकेला जाग