नवी मुंबई पोलीस दलात खांदेपालट

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नवीन बदली आदेशानुसार नवी मुंबई आयुक्तालयातील १० पोलीस निरीक्षकांची अदलाबदल करण्यात आली आहे. यामध्ये संबधित अधिकाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

या बदली आदेशामध्ये पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांची गुन्हे शाखेतून कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांची गुन्हे शाखेतून उरण पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी तसेच पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची वाहतूक शाखेतून वाशी पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी, सीबीडी पोलीस ठाणेतील पोलीस निरीक्षक अरुण पवार यांची सीबीडी पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी, पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांची वाहतूक शाखेतून न्हावा-शेवा पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी, कोपरखैरणे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची वाहतूक शाखेत, तसेच वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची विशेष शाखेत, सीबीडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांची सुरक्षा शाखेत, एनआरआय पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कदम यांची वाहतूक शाखेत, तर पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांची विशेष शाखेतून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ मुंबई शहर पोलीस आयुक्तालयातून नुकतेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर बदलीने दाखल झाले असून त्यांची एनआरआय पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (१) आणी (२) मधील सुधारित स्पष्टीकरणानुसार पोलीस आयुक्त स्तरावरील आस्थापना मंडळाच्या अधिकारान्वये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेत प्रशासनिक निकड आणि जनहिताचा विचार करुन या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन पदस्थापना करण्यात आल्या आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहरातील विविध ठिकाणांची आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी