१२ ऑगस्ट रोजी भावे नाट्यगृहात रंगणार मंगळागौरीचा कार्यक्रम

‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'तर्फे मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई : ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या वतीने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी खास मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळागौरी कार्यक्रम येत्या १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या अध्यक्षा तथा ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

नवीन लग्न झाल्यावर नववधुंसाठी अनेक विधी असतात, अनेक सण साजरे करायचे असतात. श्रावण महिन्यात तर अनेक विधी पुजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीच्या जीवनातील असाच एक साजरा करण्यात येणारा सण अर्थात मंगळागौर होय. ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था' गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने सांस्वृÀतिक महोत्सव आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असते. त्याअनुषंगाने ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या वतीने १२ ऑगस्ट रोजी आयोजित मंगळागौर कार्यक्रमात विविध खेळ खेळण्याचा अनादी काळापासून चालत आलेला प्रघात दिसून येणार आहे. यामध्ये मंगळागौरीची पारंपारिक नृत्य, गाणी म्हणत खेळ खेळून मनमुराद आनंद लुटता येणार आहे. तसेच यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फु बाई फु, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची संधी महिलांना मिळणार आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

तसेच या मंगळागौरीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य, पारंपारिक गायन आणि विविध प्रकारच्या कला दाखविणाऱ्या महिलांना प्रथम परितोषिक ५००१ रुपये, द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये, तृतीय परितोषिक २००१ तसेच उत्तेजनार्थ बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ‘लकी ड्रॉ'च्या माध्यमातून भाग्यवान महिला विजेत्यांना पैठणी, नथ अशा विविध प्रकारची बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी होणार आहे.

दरम्यान, मंगळागौरीचा कार्यक्रम फक्त १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मर्यादित असून प्रवेश विनामुल्य आहे. कार्यक्रमातील नांव-नोंदणी तसेच महिला बचत गटांना स्टॉल (विनामूल्य) लावायचे असल्यास त्यांनी आरती राऊल (९९६७६४८०९१), हेमंत कोळी (९१६७३०२८२७), आदित्य नेवरेकर (७३०४३३९३३३) यांना संपर्क साधायचा आहे. नांव-नोंदणीसाठी अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे याची सर्व महिलांनी नोंद घ्यावयाची आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘माझी माती माझा देश' अभियान