अर्बन हाट सुरु करा; आ.मंदाताई म्हात्रे यांची अधिवेशनात मागणी

महिला बचत गट, हस्तकला, हातमाग कलाकारांना हक्काच्या बाजारपेठेपासून वंचित

नवी मुंबई : राज्य शासनाच्या लघू उद्योग विकास विभागाकडे ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पर्यावरणाला धक्का न लावता नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील १२ एकरच्या टेकडीवर उभारण्यात आलेल्या ‘कलाग्राम (अर्बन हाट)'ला ‘सिडको'ने लावलेले टाळे आता लवकरच उघडले जाणार आहे.

कोरोना काळानंतर ‘सिडको'ने बंद ठेवलेले अर्बन हाट पुन्हा कार्यान्वित न करता ‘अर्बन हाट'ला कायमचे टाळे ठोकले होते. त्यामुळे महिला बचत गट, असंख्य हातमाग आणि हस्तकला कलाकारांची हक्काची बाजारपेठ हिराऊन घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हर्बन हाट सुरु करण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात विशेष मागणी केली आहे. त्यामुळे महिला बचत गटांना आणि असंख्य हस्तकला, हातमाग कलाकारांना हक्काची बाजारपेठ पुन्हा उपलब्ध असून राज्यासह विविध राज्यातील उत्पादकांना सुगीचे दिवस येतील.

दरम्यान, आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यापूर्वी हर्बन हाट योग्य ती डागडुजी करुन लवकरात लवकर सुरु करण्यासाठी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना पत्र दिले आहे.

मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता याकरिता राज्य शासनाने निर्माण केलेल्या नवी मुंबईत एकही नैसर्गिक आकर्षक स्थळे नाहीत. त्यामुळे सिडको आणि महापालिकेच्या यांच्या संयुक्त माध्यमातून कृत्रिम पर्यटन स्थळांची निर्मिती करण्यासाठी विधान परिषद सदस्या असताना प्रयत्न केला. त्याअनुषंगाने ‘सिडको'चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अशोक सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाकडून आणि राज्य शासनच्या लघु उद्योग विकास विभागाकडून बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ सुमारे १२ एकरच्या टेकडीवर सन २००८ रोजी कलाग्राम (अर्बन हाट) उभारण्यात आले. त्यामुळे देशातील महिला बचत गटांना आणि राज्यातील कलाकारांना एक हक्काची बाजारपेठ तयार करुन देण्यात आली होती. सन २०१० रोजी या ‘कलाग्राम'चे कायमस्वरुपी लोकार्पण झाल्यानंतर याठिकाणी सिडको आयोजित नवी मुंबई फेस्टिवल अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच ॲम्पीथिएटर मध्ये जाहीर कार्यक्रमांना आणि फेस्टीव्हलला हिंदी-मराठी क्षेत्रातील सिनेकलावंतांनी ‘कलाग्राम'ला भेटी दिल्या आहेत, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

या ‘हर्बन हाट'मध्ये गणेश उत्सव, श्रावण मेळा, दसरा मेळा, दीप मेळा अशा अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होत होते. तसेच हरियाणा, केरळ, राजस्थान, आदि विविध राज्यातून कलाकारांनी स्वतः तयार केलेली उत्पादने येथे विकण्यास येत होती. परंतु,  कोरोना काळात ‘सिडको'ने ‘अर्बन हाट'ला टाळे लावल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सदर बाब लक्षात येताच ‘अर्बन हाट'ची संपूर्णता डागडुगी पूर्ण करुन ते लवकरात लवकर पावसाळ्यात नंतर सुरु करुन द्यावे, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात केली. - आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘काँग्रेस'चे रविंद्र सावंत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र