‘पनवेल'च्या सुकन्यांचे भविष्य होणार समृध्द!

आ. प्रशांत ठाकूर स्वखर्चाने १००० मुलींचे ‘सुकन्या समृध्दी योजना'तील खाते उघडणार

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात २०२३ मध्ये जन्मलेल्या १००० मुलींना सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते स्वखर्चाने एक हजार रुपये भरुन या बालिकांचे नवीन खाते उघडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त सदर स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

सुकन्या समृध्दी खाते मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. सदर योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून २२ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर योजना सुरु केली होती. केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक आणि पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या तसेच बचत ठेवीच्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात. त्यापैकी सुकन्या समृध्दी योजना आहे. या माध्यमातून आई-वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करु शकतात. मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते
मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने ‘सुकन्या समृध्दी योजना'ची सुरुवात करण्यात आली आहे. तिचे भविष्यात आत्मनिर्भर आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुलींना सन्मानाने जगता यावे, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे, उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे असा एक प्रमुख हेतू या पाठीमागे मानला जातो.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात १ जानेवारी ते २३ जुलै २०२३ या दरम्यान जन्मलेल्या १००० मुलींना ‘सुकन्या समृध्दी योजना'चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. ते स्वतः या मुलींचे एक हजार रुपये भरुन नवीन खाते उघडणार आहेत. त्यानंतर संबंधित पालकांना आपल्या मुलीच्या खात्यावर दरमहा रक्कम भरल्यानंतर मुलींना शिक्षणासाठी या बचतीचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, २०२३ मध्ये जन्मलेल्या आपल्या सुकन्येच्या समृध्द भविष्यासाठी अमरीश मोकल यांच्याकडे ९८२१८८२००७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आ. प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ तास ३६५ दिवस सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारे नेतृत्व आहे. जनसामान्यांचे नेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिका क्षेत्रातील १००० मुलींचे ‘सुकन्या समृध्दी योजना'साठी नवीन खाते उघडण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्या खात्यात एक हजार रुपये आम्ही भरणार आहोत. त्यामुळे पालकांकडून तिच्या भविष्यासाठी बचत नक्कीच केली जाईल. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करीत आहे. - आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठोक मानधनावर महापालिका कर्मचाऱ्यांच्या असुविधांबाबत बेमुदत उपोषणाचा इशारा