नमस्कार देवी और सज्जनो, नवी मुंबई दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपर आपका स्वागत है!

नवी मुंबई विमानतळाच्या नावाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव लागणार -आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राज्य शासनाकडून लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार असून लवकरच नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीयांकडून करण्यात आली होती. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त नेत्यांकडून आणि नामकरण वृÀती समितीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात सिडको प्रशासन, राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने मागणी करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्यावे या एकाच मागणीकरिता नवी मुंबईसह मुंबई, रायगड, ठाणे, भिवंडी, पालघर, आदि ठिकाणच्या भूमीपुत्रांनी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने मानवी साखळी तसेच लाखो भूमीपुत्रांच्या मोर्चाच्या माध्यमातून २४ जून २०२१ रोजी ‘सिडको'ला घेराव आंदोलन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचेळी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारे पत्र दिले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव आम्हीच दिले आहे. लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेवेळी सांगितल्याची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कानात ‘नमस्कार देवी और सज्जनो नवी मुंबई दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय हवाईअड्डे पर आपका स्वागत है!े असा एकच आवाज गुंजणार आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

गेल्या काही काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावरुन स्थानिक प्रकल्पग्रस्त विरुध्द राज्य सरकार असा वाद सुरु होता. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्यावरुन स्थानिकांचे मोठे आंदोलन देखील झाले होते. नवी मुंबईची निर्मिती स्थानिक आगरी-कोळी-कराडी प्रकल्पग्रतांच्या जमिनीवर करण्यात आली आहे. याच जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून या विमानतळाच्या नामकरणावरुन राजकीय वाद सुरु झाले होते. पण, आता या वादाला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. - आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'तर्फे ‘दि.बा.पाटील चळवळ स्पर्धा'चे आयोजन