शिव आरोग्य सेनेने राबवले जनआरोग्य अभियान ​​​​​​​

 नवी मुंबई शिवआरोग्य सेनेच्या जनआरोग्य अभियानास चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या वतीने संघटनेच्या अध्यक्षा डॉ.शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई विभागीय समन्वयक प्रविण वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिव आरोग्य सेनेतर्फे सामान्य नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जन आरोग्य अभियान १० ते १९ जुलै दरम्यान राबवण्यात आले. त्यास नागरिक व महापालिका अधिकारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.

या अभियाना अंतर्गत ऐरोली व बेलापूर विधानसभा मधील ए वॉर्ड, जी वॉर्ड, बी वॉर्ड, सी वॉर्ड, ई वॉर्ड, एफ वॉर्ड व डी वॉर्ड या सर्व वार्ड अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पावसाळ्यात होणारे साथीचे आजार व नाले सफाई अशा अनेक गोष्टीवर प्रत्येक वार्ड अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. घणसोली विभागात जन आरोग्य अभियान दिनांक ११ जुलै रोजी राबविण्यात आले असता १८ जुलै रोजी घणसोलीत पालिकेला डेंग्यूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर घणसोली वैद्यकीय अधिकारी व अन्य प्रशासकीय घटकांनी योग्य प्रतिसाद देऊन यंत्रणा कार्यांन्वित केली. या अभियानात शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिक यांनी सहभाग घेतला. ऐरोली विधानसभा आरोग्य संघटक अक्षय गोरे बेलापूर विधानसभा समन्वयक श्रीकांत साळवी, ऐरोली विधानसभा समन्वयक अविनाश गोळे बेलापूर विधानसभा आरोग्य संघटक राकेश यादव तसेच समन्वयक सचिव रोहित शिरसाट, राजेश काळे, युगांतर लोखंडे, मनोज राऊत, मंजुळा म्हात्रे, केशव शिंदे, नमिता सुरवसे, संकेत मोरे, अनिरुद्ध नरुटे, शिवसेना पदाधिकारी श्रीकांत हिंदळेकर, संदीप पवार, डॉ शिवकुमार नायकवडे, आशा शिंदे, ज्योती पवार, वैजयंती म्हात्रे, अर्चना कंक, योगेश खुटवड, रत्नप्रभा जाधव, प्रणय म्हात्रे, यशोदा चासकर, मंगला बालपुरे, वेदांत गव्हाणे, प्रताप पिसाळ, आशिष गव्हाणे, सुशांत जाधव, प्रसाद देवडकर, पवन नागवडे हे सर्व शिवसेना - युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नमस्कार देवी और सज्जनो, नवी मुंबई दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय हवाईअड्डेपर आपका स्वागत है!