मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
किरीट सोमय्या यांचा शिवसैनिकांकडून निषेध
वाशीत जोडे मारो आंदोलन
नवी मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या बाबतचा वादग्रस्त व्हिडीओ लोकशाही टिव्हीने प्रसारित केला आहे. किरीट सोमय्या यांचा सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्याचे पडसाद राज्यभरात उमटून महिलांमध्ये जनाक्रोश निर्माण झालेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांचा निषेध केला जात आहे.
नवी मुंबई मध्ये देखील किरीट सोमय्या यांच्या विरोधात पडसाद उमटलेले पहायला मिळाले असून ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)'च्या वतीने १८ जुलै रोजी वाशीतील शिवाजी महाराज चौक येथे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी या जोडे मारो आंदोलनात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या आंदोलनाप्रसंगी ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)'चे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर यांच्यासह महिला जिल्हा संघटक सौ. रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, माजी नगरसेवक विजयानंद माने, शहरप्रमुख विजय माने, माजी नगरसेविका सौ. कोमल वास्कर, सौ. आरती शिंदे, शत्रुघ्न पाटील, विशाल विचारे, आदि पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.