जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
सुरक्षा रक्षकांना छत्रीवाटप तसेच क्रिकेट सामने आयोजित करुन उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रीवाटप, क्रिकेट सामने
नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवक-उद्योजक शिवसैनिक हरीश इंगवले यांनी नेरुळमधील हाऊसिंग सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना मोफत छत्रीवाटप केले. तसेच दोन दिवसीय ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचेही आयोजन केले होते. वाढत्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता पावसापासून सुरक्षारक्षकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने छत्रीवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
ह्या कार्यक्रमास ईश्वरा इंगवले, रामपाल, अनिल कुलकर्णी, दासा भोसले, निखिल नेटके व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हरीश इंगवले आयोजित दोन दिवसीय भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील एकूण १६ संघांनी आपला सहभाग नोंदवला. नेरूळमधील रामलीला मैदानावर हे सामने पार पडले. शिवसेनेच्या नेरूळ विभागातील पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या सामन्यांचे आयोजन करण्यासाठी सचिन धुमाळ यांनी विशेष प्रयत्न केले. स्पर्धेची अंतिम लढत कोपरी गावातील रिद्धी सिद्धी संघाने जिंकत प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली. तर कुशल इलेवन या संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पारितोषिक वितरण सोहळ्याला जिल्हाप्रमुख वि्ीलराव मोरे, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, शहरप्रमुख विजय माने, महानगर प्रमुख सोमनाथ वासकर, उपशहर प्रमुख गणेश घाग, उपशहर प्रमुख शिवाजीराव शिंदे, माजी नगरसेवक काशीनाथ पवार, विभागप्रमुख तानाजी जाधव, उपविभाग प्रमुख प्रल्हाद पाटील, उपशाखाप्रमुख दासा भोसले, महिला संघटिका रेश्मा वेंगुर्लेकर, युवासैनिक निखील नेटके, जेष्ठ शिवसैनिक संतोष भिसे, जेष्ठ शिवसैनिक राम कदम, रियल इस्टेट कंन्स्लटंट अशोक गोमानी, खटाव गोमानी, माजी प्रभाग समिती अध्यक्ष आनंदराव नाईक यांच्यासह नवी मुंबईतील अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी नवी मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर्स गामी ग्रुपचे सहकार्य लाभले.