जगात प्रदुषणाच्या बाबतीत दिल्ली अव्वल

दिल्लीतील किंवा देशातील वाढते प्रदुषण फटाक्यांमुळे वाढत नसुन मानवाच्या चुकांमुळे वाढत आहे ही बाब ‘एस ॲंड पी ग्लोबल मोबिलिटी वेब प्रेझेंटेशन या संस्थेने घेतलेल्या सर्वेवरून लक्षात येते. आजही दिल्लीतील अनेक नद्यांनी प्रदुषणाची पातळी ओलांडल्याचे दिसून येते. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळणे, श्वास घेण्यास त्रास सोबतच आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेक समस्या पहायला मिळत आहेत.

वाढते औद्योगिकीकरण, वाढती हवाई वाहतूक, रोड वाहतूक व अत्याधुनिक साधनसामुग्रीचे उत्पादन यामुळे नदी-नाले, जल-स्थल-वायु या संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढल्याने प्रदुषणाचा धोका दिवसेंदिवस भारतात वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दिल्ली प्रदुषणाच्या बाबतीत अव्वल असल्याचे ‘एस ॲंड पी ग्लोबल मोबिलिटी वेब प्रेझेंटेशन' या जागतिक संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यामुळे दिल्लीतील जहरीली हवेमुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडल्याचे दिसून येते. कारण दिल्लीतील प्रदुषणाने संपूर्ण सीमारेषा ओलांडल्याचे दिसून येते.२० नोव्हेंबर २०२४ ला दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) ४२६ च्या वर म्हणजेच अत्यंत गंभीर पातळीवर होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राजधानी दिल्लीत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रदुषणामुळे वातावरण एवढे खराब झाले होते की ७९ विमानांना येण्यास विलंब झाला; तर ६ विमानांचे मार्ग बदलविण्यात आले. यावरून आपण समजू शकतो की विमानांवर प्रदुषणाचा एवढा गंभीर परिणाम होवू शकतो; तर मानवजाती, पशुपक्षी व अन्य जिवजंतुंवर कीती मोठा आणि घातक परिणाम होत असेल, हे दिल्लीच्या प्रदुषणावरून स्पष्ट दिसून येते. राजधानीतील प्रदुषण अत्यंत चिंताजनक पातळीवर गेल्याने शाळा, महाविद्यालय यांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्याचप्रमाणे  ५० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना घरूनच कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खाजगी कार्यालयांनाही बहुतांश कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम' सुविधा द्यावी असे आवाहन राज्य सरकारने खाजगी कार्यालयांना केले आहे. कारण प्रदुषणाचा धोका दिवसेंदिवस गडद होत चाललेला आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रदूषणामुळे संपूर्ण दिल्ली धुरकट झालेली आहे.

 जगातील १०० प्रमुख शहरांच्या तुलनेत भारतातील ३९ शहरे प्रदुषणाने संपूर्णपणे जखडलेले आहेत. म्हणजेच आज भारत प्रदुषणाचे माहेरघर झाल्याचे संपूर्ण चित्र दिसून येते.जगातील प्रदुषणाच्या बाबतीत तुलना केली तर भारत प्रथम क्रमांकावर असुन यात ३९ शहरे आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन असुन ३० शहरे प्रदुषणाच्या बाबतीत अव्वल आहेत. त्या खालोखाल पाकिस्तान -९, बांगलादेश -५, ईरान-३, दक्षिण आफ्रिका -३, नेपाळ -२, इंडोनेशिया -२ व इतर देशांतील ७ शहरे याप्रकारे ‘एस ॲंड पी ग्लोबल मोबिलिटी वेब प्रेझेंटेशन' या जागतिक संस्थेने नुकतीच १०० प्रदुषित शहरांची सुची जाहीर केलेली आहे, यात भारताची चिंताजनक परिस्थिती दिसून येते.

दिल्लीमध्ये दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होते, अशा प्रकारच्या बातम्या व मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येत होत्या. यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्यात आलेली होती; तरी दिवाळीच्या महत्त्वपुर्ण सण पहाता फटाके फोडण्यात आले होते व यामुळे संपूर्ण दिल्ली प्रदुषित झाली अशा बातम्या आपण सर्वत्र ऐकल्या व पाहिल्या. परंतु आता फटाके कुठेच फोडतांना दिसत नाही, याचाच अर्थ असा की दिल्लीतील प्रदुषण असो अथवा देशातील कुठलेही प्रदुषण असो फक्त फटाक्यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही.

दिल्लीतील किंवा देशातील वाढते प्रदुषण फटाक्यांमुळे वाढत नसुन मानवाच्या चुकांमुळे वाढत आहे ही बाब ‘एस ॲंड पी ग्लोबल मोबिलिटी वेब प्रेझेंटेशन या संस्थेने घेतलेल्या सर्वेवरून लक्षात येते. आजही दिल्लीतील अनेक नद्यांनी प्रदुषणाची पातळी ओलांडल्याचे दिसून येते. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळणे, श्वास घेण्यास त्रास सोबतच आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेक समस्या पहायला मिळत आहेत. दिल्लीत सध्या हाफ लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील असो वा देशातील ३९ शहराच्या बाबतीत असो;  प्रदुषणाला आपणच जबाबदार आहोत. कारण हवाई वाहतूक, रोड वाहतूक, एसी, अत्याधुनिक सुविधा यामुळे मानवाला बंद रूममध्ये आल्हाददायक वातावरण मिळतेही बाब खरी आहे.परंतु या अत्याधुनिक सुविधांमुळे करोडो लोकांचा, पशुपक्षांचा, अन्य जिवजंतुंचा व बदलत्या वातावरणामुळे निसर्गाचा जीव धोक्यात आलेला आहे ही बाब दिल्लीतील एक्यूआय ४२६ वरून लक्षात येते. आजही दिल्लीसह देशातील अनेक वाहने दुषित धुर ओकत आहे. दिल्लीमध्ये काही ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यात ग्रेप-४ मध्ये अनेक वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत बाहेरून येणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. फक्त आवश्यक वस्तूंच्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. राज्य सरकारने शाळा-महाविद्यालय सध्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत; तर गैर आपात्कालीन वाणिज्यिक आवागमन यावर सरकार बंदी घालु शकते याला नाकारता येत नाही. आपल्याला प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाहणांचा दूषित धुंद यावर सुध्दा नियंत्रण आवश्यक आहे. आपण जोपर्यंत निसर्गाच्या सानिध्यात वावरणार नाही आणि निसर्गाला महत्त्व देणार नाही तोपर्यंत प्रदुषण रोखण्यास यश येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लागवड झालीच पाहिजे यामुळे आपल्याला प्रदुषणावर मात करण्यात यश येईल. - रमेश कृष्णराव लांजेवार 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गेट आउट