modi@9 महा-जनसंपर्क-अभियान अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्रात टिफीन बैठकीच आयोजन

 

टिफीन बैठकीद्वारे पंतप्रधान मोदी यांची ९ वर्षातील कामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न -आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने modi@9 महा-जनसंपर्क अभियान सर्वत्र राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाने ज्येष्ठ असून ते आजही तरुण वयाप्रमाणे काम करीत आहेत. भारत देशाला आज जो मान-सन्मान मिळाला आहे तो केवळ पंतप्रधान मोदी यांच्यामुळे मिळाला आहे. modi@9 महा-जनसंपर्क अभियान टिफीन बैठकीसाठी सर्व ज्येष्ठ बांधव आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, याबद्दल आंनद वाटत आहे. कुठेतरी आम्ही सर्व ज्येष्ठ बांधव आणि तरुण वर्गाला एकत्र करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेली कामे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात झालेली विकास कामे यांचा अहवाल टिफीन बैठक कार्यक्रमांतर्गत चर्चा करुन जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

सदर टिफीन बैठक प्रसंगी ‘भाजपा'चे माजी नगरसेवक दीपक पवार यांनी वार्ड क्र.१०७ भीमा टॉवर, सेक्टर-५० (नवीन) सीवुडस्‌ येथे, सानपाडा येथील समाजसेवक पांडुरंग आमले तसेच नेरुळ, सेक्टर-१८ ए येथील समाजसेवक राजू तिकोने यांनी टिफीन बैठकीचे आयोजन केले होते.

याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत रुपेश चव्हाण, धीरज नोटानी, अमित हरजाई, दीपक गोराणी, संदीप सरदाना, संदीप रावत, दीपक देसाई, गरिमा, शेकावत अंकल, रमेश शेटे, मंगल वाव्हळ, श्रीपाद पत्की, नाना शिंदे, साई आमले, विस्वास कणसे, सदाशिव पाटील, रमेश नरवडे, शशिकांत मोरे, भगवान भोर, मकरंद म्हात्रे, शंतनू भोपी, शरद भोर, सोनबा घोलप, प्रदीप बुरकुल, तानाजी बाबर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘समिती'ला अहवाल सादर करण्यासाठी ३१ जुलै पर्यंतची मुदतवाढ