मनसेचे  वाशी मध्ये एक सही संतापाची अभियान

फोडाफोडीच्या राजकारणावर संतापाची लाट?

नवी मुंबई : मनसे तर्फे वाशी मध्ये ८ जुलै रोजी एक सही संतापाची अभियान घेण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २.५ वर्षात जे पक्ष, आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, त्याने महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्याच महाराष्ट्राची ही झालेली अवस्था पाहून मराठी माणसामध्ये राजकारणाबद्दल चीड निर्माण झाली आहे. याच रोषाला वाचा फोडण्यासाठी आदरणीय राजसाहेबांनी *एक सही संतापाची* हा उपक्रम राबवण्यास सर्व मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना सांगितल आहे.

त्यानुसार नवी मुंबई मनसे तर्फे ८ जुलै रोजी एक सही संतापाची हा उपक्रम वाशी स्थानकाबाहेर सकाळी घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत हजारो नागरिकांनी आपली सही बॅनर वर करून आपला राग व्यक्त केला. मनसे प्रवक्ते, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत अनेक नागरिकांनी संतापाची सही करण्याबरोबरच सरकारबद्दल राग व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभाग घेवून या घाणेरड्या राजकारण्यांवर आपला राग व्यक्त केला. मनसे हा एकमेव राजकीय पक्ष आहे जो या चिखलाने बरबटलेला नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी दिली. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी एवढी ढासळलेली असताना राज ठाकरे यांच्या हातात आता महाराष्ट्राची सत्ता दिली पाहिजे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सुद्धा सामान्य नागरिकांनी दिली.

मनसेच्या या उपक्रमात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, विनोद पार्टे , शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सह सचिव अभिजित देसाई, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, शहर संघटक अनिकेत पाटील, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, विधी सेना शहर अध्यक्ष ॲड. निलेश बागडे, सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे, महिला सेनेच्या उप शहर अध्यक्ष दिपाली ढवूल, अनिथा नायडू, मनसे विभाग अध्यक्ष सागर विचारे, अभिलेश दंडवते, नितीन नाईक, विशाल चव्हाण, चंद्रकांत डांगे, उमेश गायकवाड, सुहास मिंडे, अक्षय भोसले, निलेश जाधव, चंद्रकांत  मंजुळकर, सखाराम संकपाळ व मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी