पनवेल मधील उद्यानांची दुरावस्था

माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून नाराजी व्यवत

नवीन पनवेल : पनवेल महापालिकेने ‘सिडको'च्या विभागातील गार्डन हस्तांतरित करुन घेतले आहेत. उन्हाळ्यामध्ये तिथे बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यानेच अनेक उद्यानांची वाताहात होती. आता पावसाळा सुरु झाला असून सदर परिस्थितीत महापालिका आयुक्तांनी पाहणी करुन नव्याने वृक्षारोपण आणि इतर व्यवस्था पूर्ववत होईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पनवेल, सेक्टर-३ येथील गार्डन मध्ये रात्री अंधाराचा फायदा घेऊन दारु पिण्याचे प्रकार वाढत आहेत. मद्य प्राशन केल्यानंतर दारुच्या बाटल्या तशाच उद्यानात फेवूÀन द्यायच्या. याशिवाय परिसरातील फुटपाथवर मातीचा ढिग, रेबिट ठेवले गेले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या चालायचा प्रश्न निर्माण होत आहे. गार्डनमध्ये रात्रीच्या वेळी दिवे सुरु नसतात. अंधाराचा फायदा घेऊन भविष्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षारक्षक २४ तास नेमण्यात यावा. त्वरित लाईटचीही व्यवस्था सुरु करण्यात यावी. तेथील सुविधांच्या बाबतीत अशा प्रकारची सद्यपरिस्थिती प्रितम म्हात्रे यांनी आयुवत गणेश देशमुख यांच्यासमोर  पत्राद्वारे मांडली.

सदर सर्व गोष्टी गांभीर्याने पाहून महापालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांची पाहणी करुन नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी उद्याने सुस्थितीत करावी, अशी मागणीही प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.

‘सिडको'कडून हस्तांतरीत झालेल्या उद्यानांच्या बाबतीत अशा प्रकारची परिस्थिती महापालिका क्षेत्रातील बऱ्याचशा उद्यानांमध्ये सध्या आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करावी, यासाठी मागणी केली आहे. तसेच यापुढे त्याचा पाठपुरावा सुध्दा करेन. -प्रितम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेता-पनवेल महापालिका. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मनसेचे  वाशी मध्ये एक सही संतापाची अभियान