‘आप'तर्फे ठाणे येथे सहभोजन सभा संपन्न

महाराष्ट्रातील खोकेबाज राजकारणाला आप हाच एकमेव पर्याय - गोपाळ इटालिया

ठाणे : ‘आम आदमी पार्टी'ला सुरत महापालिकामध्ये २७ नगरसेवक, गुजरात विधानसभेत ५ आमदारांसह १४ टक्के वोट शेयर मिळवून देऊन ‘आप'ला ‘राष्ट्रीय पार्टी'चा दर्जा मिळवून देणारे गोपाळ इटालिया यांना ‘आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्यासाठी पाठवले आहे. त्यानुसार गोपाळ इटालिया यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून प्रत्येक जिल्याचा आढावा घेत, प्रत्यक्ष भेटी घेऊन जिल्हा कार्यकारिणीशी सक्रिय संवाद साधला.

गोपाळ इटालिया यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम २८ मे ते ६ जून २०२३ दरम्यान ‘स्वराज्य यात्रा'चे यशस्वी आयोजन करण्यात आले. भगवान विठोबाच्या आशीर्वादाने, पंढरपुर येथून आरंभ झालेली स्वराज्य यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून मार्गस्त होत ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी रायगड येथे समाप्त झाली. त्यानंतर गोपाळ इटालिया यांच्या आवाहनानुसार १२ ते १८ जून दरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधील तालुका स्तरावर स्वराज्य संवाद कोपरा सभा आणि सभासद नोंदणी आयोजन करण्याचे आवाहन केले गेले. या कोपरा सभांना चांगलाच प्रतिसाद मिळून ‘आप'मध्ये मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी सुध्दा झाली.

यानंतर गोपाळ इटालिया यांनी प्रभावी व्यवस्थापनासाठी ‘आप'च्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे विदर्भ-पूर्व, विदर्भ-पश्चिम, मराठवाडा-पश्चिम, मराठवाडा-पूर्व, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नवी मुंबई आणि कोकण असे विभाग करुन प्रत्येक विभागाला  राज्य समिती आणी विभागातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीसह ‘सहभोजन सभा'चे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ३० जून रोजी नवी मुंबई आणि कोकण दोन विभागाअंतर्गत ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्हा, तालुका आणि महापालिका समित्या तसेच पनवेल, वसई-विरार, मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर तालुका क्षेत्रातील ‘आप'चे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ठाणे येथे सहभोजन सभा आयोजित करण्यात आली होती. 'आप'चे सर्वच कार्यकर्ते जोमाने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

महाराष्ट्रातील खोकेबाज राजकारणाला, सामान्यजनांची आम आदमी पार्टी हाच एकमेव पर्याय उरला आहे. आता सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात, वॉर्डस्‌ वर लक्ष केंद्रित करुन प्रत्येक वॉर्डच्या सुध्दा समित्या बनविण्याच्या तयारीला लागावे, अशी सूचना ‘आप'चे महाराष्ट्र सहप्रभारी गोपाळ इटालिया यांनी ‘सहभोजन सभा'वेळी केली.
ठाणे टीम ने,  मेहनतीने आयोजित केलेल्या स्नेह भोजन सभे मुळे आणी गोपाल भाई इटालीया यांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये सकारत्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात आपण सर्वजण एकत्रितरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर अधिक वेगाने संघटना बांधणीचे काम करुन आगामी निवडणुकांना सामोरे जाऊ. त्याद्वारे ‘आप-दिल्ली'सारखे काम महाराष्ट्रात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुया, असे आवाहन ‘आप'चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या ‘आमदार निधी'तून आग्रोळी गांव येथे सभा मंडपाची निर्मिती