शासन आपल्या दारी अंतर्गत उद्योग मंत्री तथा ‘रायगड'चे पालकमंत्री उदय सामंत यांची उद्योजकांशी चर्चा

उद्योगमंत्र्यांची ‘तळोजा एमआयडीसी'तील उद्योजकांशी चर्चा

तळोजा ः शासन आपल्या दारी अंतर्गत राज्याचे उद्योग मंत्री तथा ‘रायगड'चे पालकमंत्री उदय सामंत यांनी २४ जून रोजी तळोजा एमआयडीसीला भेट दिली. यावेळी ना. उदय सामंत यांची ‘तळोजा एमआयडीसी'मधील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ‘तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन'च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

याप्रसंगी ‘एमआयडीसी'चे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, मुख्य अभियंता सुभाष तुपे, अधीक्षक अभियंता मनोजम बोधे, भूषण हर्षे, कालिदास बांदेकर, प्रादेशिक अधिकारी-पनवेल संतोष थिटे, कार्यकारी अभियंता एस. पी. आव्हाड, संजय ननावरे (अलिबाग), आर. पी. पाटील (अंबरनाथ), राजाराम राठोड (ठाणे-२), पागरुट (अंबरनाथ), उपअभियंता दिपक बोबडे, अविनाथ गडदे, ‘तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन'चे अध्यक्ष सतीश शेट्टी, उपाध्यक्ष बाबू जॉर्ज, सचिव बिनीत सालियन, मानद सदस्य श्रीनाथ शेट्टी, आदि उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये ना. उदय सामंत यांच्याशी ‘तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन'च्या पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाई, इंडस्ट्रीयल टाऊनशिप-औद्योगिक महापालिका, स्टेकहोल्डर्स, वृक्षारोपणासाठी कमी दर आकारणी, गहाळ लिंक रोड, ईएसआयसी रुग्णालयाची स्थापना, उद्योगांच्या बाहेर डिस्प्ले बोर्ड लावणे,  अतिरिवत ट्रक टर्मिनसची आवश्यकता, ‘तळोजा एमआयडीसी'मध्ये कचरा संकलन-विल्हेवाट व्यवस्था समस्या, नवीन प्रदर्शन केंद्र-प्रशिक्षण केंद्राची निर्मिती, सीएसआर निधी वापर, आदिंबाबत विस्तृत  चर्चा केली. त्यावर ना. सामंत यांनी काही मुद्द्यांवर तोडगा काढून काही समस्यांबाबत ‘एमआयडीसी'सह इतर संबंधित  अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सीएसएमटी येथे ‘मडगांव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस'चे स्वागत