‘काँग्रेस'तर्फे दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपला वेळ समर्पित करावा -रविंद्र सावंत

नवी मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या जुईनगर नोडमधील तसेच नेरुळ, सेक्टर-२ आणि ४ मधील विद्यार्थ्यांचा सत्कार ‘नेरुळ ब्लॉक कॉग्रेस'च्या वतीने सत्कार करण्यात आला. कामगार नेते तथा ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांनी संयुक्तपणे सदर कार्यक्रमाचे नेरुळ, सेक्टर-२ मधील ‘काँग्रेस'च्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आयोजन केले होते. दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी-बारावी नंतर पुढे काय करायचे? याबाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. मुलांना भेटवस्तू, प्रमाणपत्र आणि फुले देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जवळपास १००हुन अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.

दहावी-बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांनी हुरळून न जाता पुढील वाटचालीवर फोकस करावा. आयुष्यात काय बनायचे आहे, ते निश्चित करुन त्या ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपला वेळ समर्पित करावा. अपयश आल्यावर खचून न जाता विद्यार्थ्यांनी नव्या जोमाने प्रयत्न करावेत. आत्महत्या करणे अपयशावर उपाय नाही. त्याने फवत आपला जीव जातो. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रीत करुन स्वतःचे जीवन सार्थकी लावावे, असा मोलाचा सल्ला कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी दिला.

प्रमुख मार्गदर्शक असलेल्या व्हरगळ सरांनी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीनंतर काय करावे. पदवीपर्यत कसा अभ्यास करावा. कला, वाणिज्य, विज्ञान शाखा, वैद्यकीय, अभियांत्रिकी आदिंबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महांनद रामराजे , महेश भोईटे, विनायक तळेकर, विश्वास डीगे, सरडे अण्णा, जुईनगर ‘काँग्रेस'चे रामराजे, रवींद्र सरडे, कवलजीत सोनावणे तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

`modi@9 महा-जनसंपर्क-अभियान'