महापालिकाशिक्षण विभागाकडून ज्ञानपुष्प विद्यानिकेतन शाळेला नोटीस

ज्ञानपुष्प विद्यानिकेतन शाळा मधील स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर ‘सीबीएसई' प्रवेशासाठी दबाव

नवी मुंबई ः सीबीडी-बेलापूर सेवटर-४ मधील ज्ञानपुष्प विद्यानिकेतन शाळेकडून स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर ‘सीबीएसई' बोर्डासाठी दबाव टाकला जात असल्याने ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना' चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या शिष्टमंडळाने शाळे मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पालकांसोबत नवी मुंबई महापालिका उपायुक्त (शिक्षण) दत्तात्रय घनवट, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांची भेट घ्ोऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी पालकांनी महापालिका उपायुक्त दत्तात्रय घनवट, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यापुढे शाळेच्या विरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. तर ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त दत्तात्रय घनवट, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला दणका देत नोटीस बजावली आहे. शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावताच पालकांनी ‘मनविसे'चे आभार मानले.

याप्रसंगी ‘मनविसे'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, शहर सहसचिव स्वप्निल जोशी, मधुर कोळी, गणेश भोसले, विपुल पाटील, बेलापूर विभाग मनसे अध्यक्ष भुषण कोळी, नवी मुंबई शहर महिला सेना अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, सहसचिव सायली कांबळे तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सीबीडी-बेलापूर सेक्टर-४ मधील ज्ञानपुष्प विद्यानिकेतन शाळा व्यवस्थापनाने पालकांना विश्वासात न घ्ोता स्टेट बोर्डाची शाळा बंद करण्याचे ठरविले असून, शाळेतील विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डासाठी प्रवेश घ्यावा यासाठी शाळेकडून दबाव टाकला जात आहे. या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घ्ोत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना सीबीएसई शाळेतील शिक्षण परवडणारे नाही. त्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात २१ जून रोजी सकाळी ७ वाजता पालकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केले. या आंदोलनात ३०० ते ४०० पालक सहभागी झाले होते. या आंदोलनाला ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'ने देखील पाठिंबा दिला होता. मात्र, शाळा व्यवस्थापन पालकांना दाद देत नसल्याने पालकांनी याबाबत ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'कडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्ञानपुष्प विद्यानिकेतन शाळा व्यवस्थापनावर तात्काळ कायदेशीर कारवाई करुन पालकांना दिलासा द्यावा, यासाठी ‘मनविसे'च्या शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त दत्तात्रय घनवट, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांची भेट घ्ोऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘काँग्रेस'तर्फे दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार