स्वराज्य संवाद शृंखला अंतर्गत ‘आप'तर्फे दिघा येथे जनसभा संपन्न

 

‘आप'च्या ‘स्वराज्य संवाद' शृंखला अंतर्गत मोठी जनसभा संपन्न

नवी मुंबई : ‘आम आदमी पार्टी'च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या उपस्थितीत दिघा मधील न्यू आनंद नगर येथे, ‘आप'च्या ‘स्वराज्य संवाद' शृंखला अंतर्गत मोठी जनसभा आयोजित करण्यात आली होती. पावसाळी वातावरण असून देखील दिघा येथील नागरिकांकडून सदर ‘जनसभा'ला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. या ‘जनसभा'चे यजमानपद ‘टीम-आप नवी मुंबई'चे नेते तथा नवी मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष संतोष केदारे यांच्या टीम कडे असल्याने, दिघा युनिटच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह होता.

सभेदरम्यान ‘आप'चे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या हस्ते पक्षात नवीन कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश आणि नवीन पदाधिकाऱ्यांना नियुतीपत्र देण्यात आले. त्यानुसार दिघा येथील अर्जुन नांदुरे यांना दिघा वॉर्ड क्र.४ आणि अरविंद गुप्ता यांना वॉर्ड क्र.३ चे वॉर्ड अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच ‘आप'चे कोपरखैरणे विभाग कार्यकर्ते छगन पटेल यांना कोपरखैरणे नोड संघटक म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले.


यावेळी ‘जनसभा'मध्ये ‘आप'चे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे, नवी मुंबई सहसचिव नीना जोहरी, बेलापूर विधानसभा अध्यक्ष विलास उजगरे, ऐरोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष देवराम सूर्यवंशी, दिघाचे युवा विचारवंत दिनेश ठाकूर, युवा अध्यक्ष संतोष केदारे, आदिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘आप'चे नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम, पनवेल शहर कार्यकारी अध्यक्ष जयसिंग शेरे, कोपरखैरणे नोड अध्यक्ष किरण कौदरे, नेरुळ नोड महिला अध्यक्ष स्नेहा उजगरे, आदिंची उपस्थिती होती.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महिला ऑटो रिक्षा चालक ‘आप-नवी मुंबई'ची  बनली  पदाधिकारी