महिला ऑटो रिक्षा चालक ‘आप-नवी मुंबई'ची  बनली  पदाधिकारी

 

रिक्षा चालक महिलांमधून पुजा गोसावी यांची ‘आप नवी मुंबई ऑटो-रिक्षा युनियन'च्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती


नवी मुंबई : ‘आम आदमी पार्टी' फक्त सुशिक्षीत लोकांचीच पार्टी नसून आपल्या देशाच्या प्रत्येक देशभक्त, सुसंस्कृत, संविधान प्रेमी, इमानदार आणि मेहनीतीची कमाई खाणाऱ्या भारतीयांची पार्टी आहे. त्यामुळे ‘आप-नवी मुंबई'च्या टीम मध्ये समाजातील सर्वच स्तरातील, सर्व धर्म-जातीचे नागरिक सामील होत आहेत.

याच पार्शवभूमीवर ‘आप'च्या नवी मुंबई सहसचिव नीना जोहरी (कोपरखैरणे) यांच्या प्रयत्नाने बहुसंख्या अबोली रिक्षा चालक महिला ‘आप-नवी मुंबई'मध्ये सामील झाल्या आहेत. या रिक्षा चालक महिलांमधून पुजा गोसावी यांची ‘आप नवी मुंबई ऑटो-रिक्षा युनियन'च्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पुजा गोसावी यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र ‘आप'चे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

‘टीम आप-नवी मुंबई'मध्ये उच्चशिक्षित मोठमोठ्या पदावर काम करणारे नागरिक तर आहेतच; पण त्याचबरोबर सफाई कामगार, माथाडी कामगार, ऑटो रिक्षा चालक अशाही मेहनती व्यक्ती आहेत. ‘टीम आप-नवी मुंबई'तर्फे स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन नेहमीच महापालिका सफाई कामगारांच्या हस्तेच करण्यात येते. ‘आप-नवी मुंबई'चे कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम कायमच समाजामधील सर्व स्तरातील अशा व्यक्ती, ज्या ‘टीम आप-नवी मुंबई'तर्फे निवडणूक लढवून, जनप्रतिनिधी बनून प्रामाणिकपणे लोकसेवा करण्याच्या संधीची वाट बघत आहेत त्यांच्या शोधात असतात, असे धनंजय शिंदे यावेळी म्हणाले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर