‘modi@९ महा-जनसंपर्क-अभियान'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेल्या लोकहितांच्या कामाचा अहवाल घराघरात पोहोचविण्याचे लक्ष
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या धाडसी विचारांमुळे आणि करोडो जनतेसाठी घेतलेल्या हिताच्या जलद निर्णयामुळे देशाच्या विकास कामांच्या उभारणीत मोदी सरकारचे महत्वपूर्ण योगदान आज देशाला पहावयास मिळत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात
केलेल्या लोकहितांच्या कामाचा अहवाल देशभरात भारतीय जनता पार्टी तर्फे ‘modi@९ महा-जनसंपर्क-अभियान'च्या अंतर्गत जनतेच्या घराघरात पोहोचविण्यात येत आहे. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात १८ जून रोजी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्फत सीबीडी येथील वारकरी भवन येथे ‘व्यापारी संमेलन-स्नेहभोजन'चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात ‘भाजपा'चे नवी मुंबईचे प्रभारी अतुल कळसेकर आणि विविध व्यापारी संस्थांच्या अध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. तर ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांनी दैनंदिन नोंद वही देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.यानंतर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांशी संवाद
साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेल्या लोकहिताच्या कामांचा अहवाल सांगितला. तसेच गेल्या ९ वर्षात व्यापारांना ज्या ज्या सोयी-सुविधा प्राप्त झाल्या आहेत, त्याचा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात झालेली विकास कामे यांचाही आढावा सदर ‘संमेलन'द्वारे व्यापाऱ्यांसमोर मांडल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
‘संमेलन'ला उपस्थित असणारे व्यापारी बांधव मी पहिल्यांदा नगरसेविका झाले, तेव्हापासून ते माझ्या सोबत आहेत. मी ‘भाजपा'मध्ये पक्ष प्रवेश केला, तेव्हा देखील हेच व्यापारी बांधव माझ्या सोबत होते. त्यामुळे संमेलानाला उपस्थित असणाऱ्या व्यापारी वर्गाच्या काही अडचणी आणि समस्या असतील ते समजून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. महत्वाचे म्हणजे व्यापारी बांधवांना माझी काम करण्याची पध्दत सन १९९५ पासून माहिती आहे. त्यामुळे आजमितीपर्यंत या व्यापारी बांधवांनी मला कुठलाच प्रश्न विचारला नाही. व्यापारी वर्गामधील अत्यंत गरीब वर्ग माथाडी वर्ग असून त्यांचाकरिता यथाशवती काम केले आहे. सीबीडी येथील गुरुद्वारा असो किंवा इतर व्यापारी संस्था असो यांनाही कोरोना काळात लसीकरण आणि औषधे उपलब्ध करुन दिले, असे आमदार सौ. म्हात्रे म्हणाल्या.
याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत ‘ग्रोमा असोसिएशन'चे अध्यक्ष शरदकुमार मारु, ‘नवी मुंबई व्यापारी महासंघ'चे अध्यक्ष प्रमोद जोशी, ‘हरियाणा वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष बलवीर चौधरी, ‘केमिस्ट असोसिएशन'चे अध्यक्ष सुनील छाजर, ‘गुरुद्वारा प्रबंधक'चे अध्यक्ष जसबीर सिंग, ‘नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशन'चे अध्यक्ष दयानंद शेट्टी तसेच माजी महापौर जयवंत सुतार, ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी, ‘आयटी सेल'चे अध्यक्ष सतीश निकम, जिल्हा महामंत्री विजय घाटे, माजी नगरसेवक दीपक पवार, डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, साबू डॅनियल, गोपाळराव गायकवाड, भगवानराव ढाकणे, राजेश रॉय, विकास सोरटे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापारी बांधव, महिला, शेतकरी, कामगार अशा घटकांसाठी आरोग्यासह इतर ७० ते ८० महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. ते आज आम्ही जनतेच्या माहितीसाठी घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम ९ कलमी कार्यक्रमाद्वारे करत आहोत. सदर निर्णयांचा व्यापारी, कामगार, जनता यांना कसा फायदा होईल आणि यामुळे जास्तीत जास्त गोरगरीब तसेच विविध समाजातील जनता आमच्याशी कशी जोडली जातील ते आम्ही पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षाच्या केलेल्या कार्यअहवालातून करत आहोत. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.