सानपाडा येथील अर्धवट पादचारी पुलाचे काम लागणार मार्गी लावा

१५ दिवसात या पादचारी पुलासहित इतर समस्या मार्गी लावण्याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल - सोमनाथ वास्कर

नवी मुंबई :-सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथील शरयु हुंडाई  समोरील पादचारी पुलाचे काम अर्धवट केले आहे.  हे काम पूर्ण करावे म्हणून शिवसेनेचे माजी शिवसनेचे नगरसेवक सोमनाथ वास्कर  यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र त्यास प्रतिसाद दिला जात नाही.त्यामुळे येत्या १५ दिवसात या पादचारी पुलासहित इतर समस्या मार्गी लावण्याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोमनाथ वास्कर यांनी महारेल ला दिला आहे.

 सायन पनवेल महामार्ग हा भरधाव वेगासाठी ओळखला जातो.त्यामुळे मार्गावर रोज वाहनांची वर्दळ असते.तर या रस्त्याच्या पूर्वेला औद्योगिक वसाहत असल्याने हजारो  नागरिकांना ह रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीत जावे लागते. त्यामुळे नागरिकांना हा  मार्ग पार कारण्यासाठी  पादचारी पूल बांधला  आहे.मात्र हा पादचारी पूल एकाच रस्त्यावर बांधलेला आहे.व उर्वरित रस्त्यावर पुलाचे बांधकाम अजून केले नाही.परिणामी   पादचाऱ्यांना अर्धा रस्ता आपला जीव मुठीत घेऊन  तर अर्धा रस्ता पुलावरून पार करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे काम पूर्ण करावे म्हणून माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे   वारंवार पाठपुरावा केला आहे .तसेच या ठिकाणी महारेल मार्फत नवीन उड्डाणपुलांचे काम हाथी घेण्यात आले . मागील वर्षी सोमनाथ वास्कर  यांनी याठिकाणी धडक देत पादचारी पूल कधी बनवणार? असा जाब विचारला. त्यानंतर महारेल च्या अभियंत्यांनी वास्कर यांच्या सोबत चर्चा केल्या नंतर सदर पादचारी पूल बनवन्याचे आश्वासन दिले सोबतच दत्त मंदिर जवळील इतर कामे ही करून देण्याचे मान्य  केले होते.मात्र सदर आश्वासनाला एक वर्ष होत आले तरी महारेल  कडून कुठलीच ठोस भूमिका घेण्यात न आल्याने परिस्थिती जैसे थे वैसेच आहे.त्यामुळे येत्या १५ दिवसात या पादचारी पुलासहित इतर समस्या मार्गी लावण्याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा  सोमनाथ वास्कर यांनी  महारेल ला दिला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उद्यानाच्या भूखंड विक्रीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती