संवादातून ‘आप'च्या दिल्ली, पंजाब मधील अतिउत्कृष्ट कामांचा प्रचार

‘आप'तर्फे स्वराज्य संवाद सत्र शृंखला अंतर्गत नागरी संवाद

नवी मुंबई : ‘आम आदमी पार्टी'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून तर्फे निवडणुकांची तयारी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने  नवी मुंबईत सुध्दा लवकरच होेणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीची ‘आप'तर्फे जोरदार तयारी सुरु झाली आहे. या तयारीचा भाग म्हणून ‘आप'च्या महाराष्ट्र कार्यकारिणीने राज्यातील कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानुसार ‘टीम-आप नवी मुंबई' सुध्दा शहरामधील विविध प्रभागात स्वराज्य संवाद सभा आयोजित करुन ‘आप'च्या दिल्ली आणि पंजाबमधील अति उत्कृष्ट कामांचा प्रचार जनसामन्यांपर्यंत
पोहोचवीत आहे.

स्वराज्य संवाद सत्र शृंखलेच्या नवी मुंबईतील दुसऱ्या दिवशी आप नवी मुंबईच्या स्थानिक युनिटस्‌ तर्फे जाहीर सभा घेत सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी पक्ष सदस्यता नोंदणी अभियान सुध्दा राबविण्यात आले. १३ जून रोजीआप ‘आप'कडुन राजीव गांधी उद्यान ऐरोली, भाजी मार्केट सेक्टर-3 ऐरोली आणि नेरुळ पश्चिम येथे स्वराज्य संवाद कार्यक्रम पार पडला. तसेच  भर पावसात न्यु गणेश नगर, दिघा येथे सुध्दा चौक सभा घेऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी ४५ जणांनी आपले नांव ‘आप'मध्ये नोंदणी केले.

यावेळी ‘आप'चे मिलींद तांबे, मानसी पवार, देवराम सुर्यवंशी, नामदेव साबळे, आरती सोनवणे, गायत्री तांबे, स्नेहा उजगरे, प्रो. विलास उजगरे, दिनेश दादा ठाकुर, विनोद इंगळे, मिथुन घंटेवाड, अर्जुन नांदुरे, सतिश

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सानपाडा येथील अर्धवट पादचारी पुलाचे काम लागणार मार्गी लावा