मोदी सरकार विरोधात ‘आप'चे दिघा येथे आंदोलन

दिघा येथे मोदी सरकार विरोधात ‘आप'चे आंदोलन

नवी मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारकडून दिल्ली मधील ‘आम आदमी पार्टी'च्या सरकार विरोधात होत असलेल्या मनमानी कारभार आणि सर्वोच्च न्यायालयाने ‘आप'च्या बाजुने दिलेल्या निर्णयाविरोधातील असहकार्याविरोधात ‘टीम-आप नवी मुंबई'च्या वतीने दिघा येथे निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ‘आप'च्या कार्यकर्त्यांनी शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करुन मोदी सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

‘आम आदमी पार्टी'च्या दिल्ली येथील लोकनियुक्त सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळविण्यासाठी जी याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने ‘आप'च्या दिल्ली सरकारच्या बाजुने दिला आहे. पण, केंद्रातील भाजप सरकारने सर्वोच्च  न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करण्याचे धोरण अवलंबत संसदेमध्ये अध्यादेश काढून दिल्लीतील आप सरकारच्या अधिकाराचे हनन करण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत. केंद्र सरकारच्या सदर हुकूमशाही धोरणाचा, संविधान विरोधी कृत्याच्या निषेधार्थ ‘दिल्ली'चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे सभा आयोजित केली होती. या निषेध सभेला सामान्य नागरिकांचा चांगलाच प्रतिसादः लाभून सभास्थळी लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्याअनुषंगाने ‘आप'चे महाराष्ट्र सहप्रभारी
गोपाल इटालिया यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा समितीला, आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी शांतीपूर्ण निषेध आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. सदर आवाहनाला प्रतिसाद म्हणून ‘आप-महाराष्ट्र'च्या प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीने शांतीपूर्ण निषेध आंदोलन केले.

त्यानुसार ‘टीम-आप नवी मुंबई'तर्फे सुध्दा मोदी सरकारच्या मनमानी कारभार करण्यासाठी ठाणे-बेलापूर रोड वरील दिघा तलाव येथे शांतीपूर्ण निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्व ‘आप'चे नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे आणि ऐरोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष देवराम सुर्यवंशी यांनी केले. सदर आंदोलनाप्रसंगी ऐरोली नोड महिला अध्यक्ष आरती सोनावणे, संतोष गवळी, दिघा प्रभाग क्रमांक-१ अध्यक्ष अर्जुन नांदुरे यांच्यासह ‘आप'चे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 शाळेत घोषणाबाजी; सेंट लॉरेन्स हायस्कूल मधील ६ विद्यार्थ्यांचे निलंबन?