मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण

‘भाजपा'तर्फे modi@9 महा-जनसंपर्क-अभियान ‘बेलापूर'मध्ये राबवणार - आ. मंदाताई म्हात्रे  

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने ९ वर्षे पूर्ण केली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या धाडसी विचारांमुळे आणि घेतलेल्या करोडो जनतेच्या हिताचा जलद निर्णयामुळे देशाच्या विकास कामांच्या उभारणीत मोदी सरकारचे महत्वपूर्ण योगदान आज देशाला पहावयास मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९
वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने modi@9 महा-जनसंपर्क-अभियान अंतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे नेतृत्व न मानता जगभरातील जनता मोदी त्यांना मानत आहे. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे देशाची वाटचाल विकासाच्या मार्गाने जात आहे. त्यामुळे देश-विदेशामध्ये आपल्या भारताची प्रतिमा कशी निर्माण केली याचा ९ कलमी कार्यक्रम बेलापूर विधानसभा क्षेत्रात होणार आहेत. त्याकरिता आढावा
बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी ‘भाजपा'चे नवी मुंबईचे प्रभारी अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांनी नवी मुंबईमध्ये जो चांगला पाया रचला आणि विकास कामे करताना दोन्ही आमदारांना बरोबर घेऊन चालण्याचा काम केले असेल ते माजी महपौर जयवंत सुतार यांनी केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलदगतीने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. हेच निर्णय आम्ही modi@9 महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचा जनतेला कसा फायदा होईल आणि यामुळे जास्तीत जास्त गोरगरीब तसेच विविध समाजातील जनता कशी जोडली जातील तेआम्ही या मोदी यांनी ९ वर्षाच्या केलेल्या कार्यअहवालातून करत आहोत, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

 याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महिला जिल्हाध्यक्ष दुर्गा ढोक, माजी महपौर जयवंत सुतार, माजी नगरसेवक दिपक पवार, जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, राजेश रॉय, निलेश म्हात्रे, भाजपा मिडीया सेल अध्यक्ष विनीत मोरे तसेच विविध मंडळ अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मोदी सरकार विरोधात ‘आप'चे दिघा येथे आंदोलन