घणसोली मधील पाणी प्रश्नासाठी महिलांचा विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा

घणसोली मधील पाणीबाणी विरोधात मनसे आक्रमक

नवी मुंबई : जून महिना सुरू झालेला असला तरी नवी मुंबई शहरात अद्याप वरुण राजाचे आगमन न झाल्याने नवी मुंबई कराना कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागत आहे , त्यात भर म्हणून नवी मुंबई महापालिके कडून गेली चार महिने घणसोली कराना अनियमित पाणी पुरवठा करत असल्यामुळे घणसोली मनसेच्या वतीने विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला . यावेळी घणसोली मधील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

घणसोली गावा मधील म्हात्रे आळी, टेटर आळी, बौद्ध वाडी, अनंत नगर, बाळाराम वाडी, येथे घणसोली कॉलनी मधील घरोंदा वसाहत , सिपलेक्स वसाहत , सेक्टर १ परिसरात तसेच तळवली गावदेवी मंदिर परिसर, शांती नगर परिसरात पाण्याची वणवा जाणवत असल्याने नागरिकांचा उद्रेक झाल्याने मोर्चा काढण्यात आला असल्याचे घणसोली विभाग अध्यक्ष नितीन नाईक यांनी सांगितले .

तीन महिन्यांन पासून महापालिकेने पाण्याचा एक दिवसाचा शट डावून सुरू केलेला आहे, तरी घणसोली कराना मात्र सलग आठ ते दहा दिवसांचा जबरदस्तीचा शट डाऊन पाळावा लागत आहे , याचा निषेध काल नागरिकांनी महापालिकेत नोंदवला, त्याच बरोबर पाणी नसल्याने सर्व सामान्य नागरिक सबंधित पाणी पुरवठा उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना फोन केल्यावर सदर अधिकारी महिलांच्या सोबत उर्मट बोलतात, अरेरावीने बोलतात. घणसोलीकराना हे अधिकारी नियमित पाणी पुरवठा करण्यास असक्षम असल्यामुळे ह्या दोन्ही अधिकाऱ्यांची सर्व प्रथम घणसोली पाणी पुरवठा विभागातून तत्काळ बदली करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने मनसेने केली असल्याचे मनसेचे रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे यांनी सांगितले .

नागरिकांचा पाणी पुरवठा तत्काळ सुरळीत करावा आणि तसे शिष्टमंडळास लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी मनसेने केल्यावर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांनी नागरिकांचा पाणी पुरवठा २४ तासात सुरळीत करण्याचे लेखी पत्र शिष्टमंडळास दिले , यावेळी "पाणी आमच्या हक्काचे , नाही कोणाच्या बापाचे" , "पाणी द्या , पाणी द्या , आमच्या हक्काचे पाणी द्या" अश्या घोषणांनी नागरिकांनी परिसर दणाणून सोडला असल्याचे घणसोली विभाग अध्यक्ष रोहन पाटील आणि विशाल चव्हाण यांनी सांगितले.

याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात रस्ते आस्थापना विभागाचे शहर संघटक संदीप गलुगडे, विभाग अध्यक्ष नितीन नाईक , रोहन पाटील , उपविभाग अध्यक्ष संजय कोळी , आनंद जगदाने  शाखा अध्यक्ष भरत लोंढे , केतन कोळी , संतोष बाजड आणि घणसोली कर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिघा येथे संयुवत जयंती महोत्सव सह १०१ ‘पँथर'चा सत्कार