मंजूर कामे सुरु करण्यासाठी पुनःश्च जनआंदोलन करावे का?

मंजूर कामे सुरु करण्यासाठी पुनःश्च जनआंदोलन करावे का? - दशरथ भगत

नवी मुंबई ः वाशी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील बाजुस सानपाडा-सोनखार (पामबीच) परिसरातील सेक्टर-१,१३ ते १९ मधील नागरिकांना रेल्वे प्रवासाच्या निमित्ताने दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, ऑटो रिक्षा स्टँड, सुरळीत रस्ता-पदपथ, पोलीस बिट चौकी आणि इतर मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी तत्कालीन नगरसेवक म्हणून महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि त्यानंतर तत्कालीन नगरसेविका सौ. वैजयंती भगत यांनी पत्रव्यवहार केला होता. यानंतर केलेल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय उपोषण आंदोलन आणि त्यानंतर पाठपुराव्यामुळे विकासकामे मंजूर करुन ‘सिडको'मार्फत विकास कामांसाठी निविदा देखील काढण्यात आली. मात्र, त्यानंतरही सदर विकास कामांच्या प्रत्यक्ष सुरुवातीस विलंब आणि चालढाकलपणा होत असल्याने आता निविदा मंजूर कामे प्रत्यक्ष सुरु करण्यासाठी पुन्हा जनआंदोलन करावे लागेल काय? अशा इशारा दशरथ भगत आणि सौ. वैजयंती भगत यांनी ‘सिडको'ला दिला आहे.यासंदर्भात भगत दाम्पत्याने १ जून रोजी ‘सिडको'चे कार्यकारी अभियंता (पी.पी.ॲन्ड वयू.) मिलिंद रावराणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

वाशी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील बाजुस सानपाडा-सोनखार (पामबीच) परिसरातील सेक्टर-१,१३ ते १९ परिसर नागरी आरोग्यास हानिकारक आणि हितास उपद्रव बंद करण्यासाठी नागरिक तसेच माजी नगरसेविका सौ. वैजयंती दशरथ भगत, सौ. रुपाली निशांत भगत यांनी सातत्याने पत्रव्यवहार आणि आंदोलन केल्याने सदर परिसरात नागरी कामाची निविदा काढण्यात आली.

वास्तविक पाहता आपल्या ताब्यातील क्षेत्रात स्वच्छता, सौंदर्यीकरण करुन नागरिकांचे आरोग्य आणि हित जपण्यासाठी संविधान अधिनियम, मुलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी कार्य करण्याची जबाबदारी वेळेत पूर्ण करणे ‘सिडको'ला बंधनकारक आहे. सिडको शहर आणि विमानतळ निर्माण करु शकते. परंतु वाशी रल्वे स्टेशन (पूर्व) येथील परिसराची स्वच्छता, सुंदरता आणि दैनंदिन देखभाल-दुरुस्ती करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. आमच्याच जागा आणि आमच्याच पैशातूनच ‘सिडको'कडून नागरी हिताची मुलभूत आणि प्रागतिक विकास कार्य करुन घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत आहे, अशी खंत दशरथ भगत आणि सौ. वैजयंती भगत यांनी ‘सिडको'चे कार्यकारी अभियंता रावराणे यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केली आहे.

तसेच सानपाडा-सोनखार (पामबीच) परिसरातील सेक्टर-१,१३ ते १९ परिसरातील स्वच्छता, सुंदरता तसेच दैनंदिन देखभाल, दुरुस्ती आणि विकास कामांकरिता काढण्यात आलेल्या कार्यादेशात अल्प रक्कमेची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर कामात बचत होणारी रक्कम त्याच भागातील न केलेल्या नागरी कामांवरच खर्च करावी. त्यात बचत करु नये तसेच सेटलमेंट किंवा ती रवकम अन्य ठिकाणी खर्च करु नये, अशी विनंती देखील भगत यांनी ‘सिडको'ला शेवटी कली आहे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

घणसोली मनसे कडून पालिकेला तक्रार पत्र