महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित समस्या सोडवा

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय -आयुवत नार्वेकर

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांसंदर्भात इंटक संलग्न ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या पदाधिकाऱ्यांनी ‘युनियन'चे अध्यक्ष तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत आयुवतांशी चर्चा करीत संघटनेने  केलेल्या मागण्यांबाबत महापालिकेच्या  संबंधित विभागाने निर्णय न घेतल्याबद्दल नाराजी व्यवत केली. तसेच कर्मचाऱ्यांचा सदर विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती निवेदनाद्वारे केली.

याप्रसंगी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्यासमवेत ‘युनियन'चे सचिव मंगेश गायकवाड, सरचिटणीस संजय सुतार, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, राजेश बगेरा, नितीन बांगर, सुशांत लंबे, दिपक गावडे आणि इतर कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिका आयुक्तांनी २४ मे २०२२ रोजी कंत्राटी कामगारांना ८ दिवसीय किरकोळ रजा लागू करण्यासंबधी निर्णय जारी केला असून त्याची अद्याप आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. संबधित विभाग अधिकारी यांना विषय मार्गी लावण्याबाबत कोणतेही गांभीर्य नाही. येणाऱ्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये सदर ८ दिवसीय  किरकोळ रजांबाबत तरतूद करण्याची सूचना विभागप्रमुखांना द्यावी. कोपरखैरणे पाणी पुरवठा विभागातील कंत्राटदाराने कामगारांना १ जानेवारी २०२० पासून ते आजपर्यंतची वाढीव पगारातील थकबाकी अंदाजे ८ ते ९ हजार रुपये प्रत्येकी दिलेली नाही. याबाबत कामगारांनी कंत्राटदार आणि अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जाऊन इतर सुविधाही दिल्या जात नाही. सदर प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी. ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने केलेल्या मागणीनुसार अतिरिक्त आयुक्तांनी १८ जानेवारी २०२३ रोजी उद्यान विभागातील माळी या पदास अर्धकुशल संबंधी मंजुरी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहर अभियंता विभागाने त्यांच्या विभागातील कुशल पंप, ऑपरेटर, पर्यवेक्षक, वायरमन, नळ कारागीर, फिटर, मीटर वाचक, वाहन चालक, तारतंत्री यासह अर्धकुशल उद्यान माळी कामगार, सुरक्षा रक्षक या पदांसंदर्भात सर्व कार्यकारी अभियंता यांना लेखी सूचना देऊन येणाऱ्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे उद्यान उपायुक्त यांनी माळी पदास अर्धकुशल करण्यासंदर्भातील सूचना संबंधित कार्यालयप्रमुखांना देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'तर्फे सदर निवेदनातून आयुवतांकडे करण्यात आली आहे.
याशिवाय नवी मुंबई महापालिकेमध्ये ७ ते ८ हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहे. या कामगारांच्या वेतनातून किमान वेतन कायद्यानुसार  कपात केली जाते. परंतु, काही कंत्राटदाराकडून हाच पैसा भविष्य निर्वाह निधीकडे जमा केला जात नाही. त्यामुळे कामगारांची फसवणूक केली जाते. सुविधांच्या नावाखाली वेतन कपात केले जाते; परंतु त्याबाबतीत ज्या सुविधा मिळणे गरजेचे आहे, त्यांना त्या दिल्या जात नाही. तसेच अधिकाऱ्यांकडून सदर कंत्राटदाराची संबधित बाबींची पडताळणी न करत देयके अदा केली जातात. त्यामुळे यापुढे सदर सर्व बाबीची पडताळणी केल्याशिवाय कंत्राटदारास देयके अदा करुन नयेत. एनएमएमटी मधील कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या २ वर्षापासून गणवेश देण्यात आलेला नाही. कामगारांच्या वेतनातून रक्कम कपात करुन देखील त्यांना त्या सुविधा दिल्या जात नाहीत. याकडे वारंवार सूचित करुन देखील संबधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने सदर विषय प्रशासन स्तरावर मार्गी लावण्यात यावा. नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावे यासाठी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याच पाठपुराव्यामुळे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी २६ जुलै २०२२ रोजी ‘समान काम समान वेतन'चा प्रस्ताव प्रधान सचिव, नगरविकास यांच्याकडे सादर केला. त्यानंतर ८ ते ९ महिन्याचा कालावधी झाला तरी सदर प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे सदर प्रस्तावासंदर्भात नगरविकास विभागाकडे संयुक्त बैठक आयोजित करुन सदर निर्णय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'तर्फे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा निर्णय घेऊन विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासन आयुवत राजेश नार्वेकर यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिल्याचे ‘युनियन'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी सांगितले.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मंजूर कामे सुरु करण्यासाठी पुनःश्च जनआंदोलन करावे का?