‘काँग्रेस'च्या विद्या भांडेकर यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

नेरुळ, जुईनगर नोडमधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी

नवी मुंबई ः नेरुळ आणि जुईनगर नोडमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी
‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे अध्यक्ष अनिल कौशिक, जिल्हा प्रवक्ते तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासह ‘काँग्रेस'चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये नेरुळ, सेक्टर-२  येथील मलःनिस्सारण केंद्र हटवून त्याजागी विविध खेळांचा समावेश असलेल्या क्रीडा संकुलाची निर्मिती करणे. नेरुळ, सेक्टर-२ येथील स्मशानभूमी लगत अग्निशमन केंद्रासाठी राखीव असलेल्या भूखंडावर डेब्रीज आणि अन्य कचरा टाकला जात असल्याने परिसराला बकालपणा आला आहे. त्यामुळे सदर भुखंडाची स्वच्छता करुन त्या ठिकाणी अग्निशमन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. जुईनगर, नेरुळ (पश्चिम), सानपाडा (पश्चिम) या ठिकाणी अग्निशम यंत्रणा नसल्याने या परिसरात अग्निशमन केंद्र लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. नेरुळ, सेक्टर-४ येथील महापालिका उद्यानात आणि क्रीडांगणात विशेषतः सायंकाळच्या सुमारास गदर्ुल्ले आणि मद्यपी टोळवयांचा वावर असतो. त्यामुळे सदर उद्यानात आणि महापालिका विभाग कार्यालयासमोर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात यावी. जुईनगर, सेक्टर-२४ येथे प्राणी रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. या इमारतीचे लवकरात लवकर लोकार्पण करुन सदर रुग्णालयाला स्वर्गीय डॉ. वैभव झुंजारे यांचे नाव देण्यात यावे. जुईनगर, सेक्टर-२४ मधील भूखंड क्रमांक-१ येथील उद्यानात ओपन जीमची निर्मिती आणि सदर ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्या यावी. याच उद्यानामध्ये पावसाळ्यात तलावाचे स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी उद्यानातील पाण्याचा निचरा होण्यासाठी आताच प्रयत्न करावेत, अशा मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय जुईनगर, सेक्टर-२४, भूखंड क्र.६०च्या ठिकाणी डेब्रीज पडून तेथे जंगली झुडूपे वाढली आहेत. परिणामी, सदर परिसराला बकालपणा येवून डासांचा उपद्रवही वाढीस लागला आहे.  त्यामुळे या भूखंडावरुन कचरा हटवून त्या
ठिकाणी झाडे लावतानाच बाकडे बसवून सुशोभिकरण करण्यात यावे. जुईनगरवासियांना रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी महापालिका जलकुंभ लगत असणाऱ्या पायवाटेचा आसरा घ्यावा लागत आहे. तेथील ठेकेदार अनेकदा सदर पायवाट बंद करत असल्याने नागरिकांची गैरसोय होऊन स्टेशनला जाण्यासाठी त्यांना लांबवर वळसा घालून जावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदरची पायवाट बंद न करण्याचे ठेकेदाराला निर्देश द्यावेत. तसेच नेरुळ, सेक्टर-२,४ आणि जुईनगर नोडमधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे देण्यात यावे. शाहीर कृष्णा पाटील उद्यानातील झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात यावी. जुईनगर, सेक्टर-२३ येथील नवरात्र चौकात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे आणि शेड उपलब्ध करून देण्यात यावे, आदि मागण्या विद्या भांडेकर यांनी सदर निवेदनाद्वारे महापालिका आयुवत नार्वेकर यांच्याकडे केल्या आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

छ. शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई ते दुर्गराज रायगड रथयात्रा