‘अमित ठाकरे रक्तदाता अभियान'चे पोस्टर अनावरण

‘नवी मुंबई मनसे'चा अभिनव उपक्रम

नवी मुंबई ः ‘मनसे'चे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे (२४ मे) औचित्य साधून करुन ‘नवी मुंबई मनसे'तर्फे रक्तदान चळवळीला बळकटी मिळावी म्हणून ‘अमित ठाकरे रक्तदाता अभियान' या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. ‘मनसे'च्या राजगड कार्यालय येथे अमित ठाकरे यांच्या हस्ते या अभियानाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा पार पडला.
नवी मुंबई मध्ये मनसे करत असलेल्या सदर उपक्रमाचे कौतुक करत अमित ठाकरे यांनी स्वतःही या अभियानात सामील होत रक्तदाता म्हणून स्वतःचा फॉर्म भरला. रवतदानाचे अभियान नवी मुंबई पुरते मर्यादित न ठेवता ते संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा आणि लोकांचे, गरजवंताचे प्राण वाचवा, असा सल्ला यावेळी अमित ठाकरे यांनी दिला.
‘नवी मुंबई मनसे'च्या या अभियानात नवी मुंबईकरांनी आणि मनसे सैनिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आतापर्यंत २ हजार लोकांची रक्तदाता म्हणून नोंदणी केल्याची माहिती शहर अध्यक्ष तथा प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली आहे. तसेच यापुढे देखील रवतदाता नोंदणी सुरु राहणार असल्याचे गजानन काळे म्हणाले.
‘अमित ठाकरे रवतदाता अभियान'च्या पोस्टर अनावरण सोहळ्याप्रसंगी ‘मनसे'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, अभिजित देसाई, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे मनपा युनियनचे अप्पासाहेब कोठुळे, सनप्रीत तुर्मेकर, अनिकेत पाटील, विराट शृंगारे, लढा रक्तदानाचे ऋषी साबळे, किशोर सातपुते, आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘काँग्रेस'च्या विद्या भांडेकर यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन