आ. प्रशांत ठाकूर यांच्या मागणी, पाठपुराव्याला यश

आरटीई निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला २२ मे पर्यंत मुदतवाढ

पनवेल ः सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्याला यश आले आहे. सदर मागणी मंजूर केल्याबद्दल आ. प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.    

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे आणि दाखल्यांची पुर्तता करण्याबाबत होणारी पालकांची अडचण लक्षात घेता या समस्येवर आ. प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. शासकीय संप आणि इतर साप्ताहिक सुट्ट्यांमुळे शासकीय कार्यालये बंद राहिल्याने विद्यार्थ्याच्या पालकांना ऑनलाईन प्रक्रियेच्या विहीत मुदतीत दाखले न मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब आ. प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार असल्याच्या आशेवर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे कठिण होणार असल्याने आरटीई पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत मुदतीची निर्माण होणारी अडचण दूर करावी तसेचआरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्र आणि दाखल्यांची पुर्तता करण्यात होणाऱ्या अडचणी दुर कराव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. दीपक केसरकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

आ. प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत ना. दीपक केसरकर यांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली असून, त्या संदर्भात शासनाकडून परिपत्रक १२ मे रोजी जाहीर करण्यात आले आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) ५ एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आली  होती. आरटीई प्रवेश निवड यादीतील बालकांचे प्रवेश मुदत १३ एप्रिल २०२३ ते ८ मे २०२३ पर्यंत होती, ती मुदतवाढ दिनांक १५ मे २०२३ पर्यंत देण्यात आली होती. आता मात्र कागदपत्रांची तपासणी करणे आणि प्रवेश निश्चितीकरीता दिनांक २२ मे २०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली  आहे. त्या अनुषंगाने सदर वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात येणार आहेत, असे शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून पाल्य आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. दीपक केसरकर तसेच शालेय शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात