उद्यानातील दुरावस्था दूर करण्यासाठी ‘आप'चे विभाग अधिकाऱ्यांना निवेदन

 सीवुडस्‌ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील साहित्याची दुरावस्था

नवी मुंबई ः सीवुडस्‌ (पश्चिम), सेक्टर-४२ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील लहान मुलांना खेळण्याची उपकरणे तसेच व्यायामाची उपकरणे नियमित देखभाली अभावी नादुरुस्त अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येत नाही.

सध्या बच्चे कंपनीला उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे. पण, सीवुडस्‌, सेक्टर-४२ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेली नियमित देखभाल-दुरुस्ती अभाची नादुरुस्त झाली आहे. जर योग्य प्रकारे या खेळाच्या साहित्यांची देखभाल झाली असती तर आज या बच्चे कंपनीला सदर उपकरणांचा योग्य उपयोग करता आला असता. याशिवाय सदर उद्यानात पाण्याची पाईपलाईन मधून पाणी वाहत असल्याने उद्यानात पाणी साठत असते. यामुळे येथे येणाऱ्या बच्चे कंपनीसह इतर नागरिकांची देखील गैरसोय होत असल्याची बाब ‘टीम-आप नवी मुंबई'च्या वतीने महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील सर्वच उपकरणे लवकरात लवकर व्यवस्थित दुरुस्त करुन त्यांच्या देखभालीची कायमस्वरुपी व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे उद्यानातील पाण्याच्या पाईपलाईन मधील लिकेजची देखील दुरुस्ती करावी, अशी मागणी करणारे निवेदन ‘टीम-आप नवी मुंबई'या वतीने ठाणे युवा अध्यक्ष चिन्मय गोडे, बेलापूर नोड अध्यक्ष महेश क्षीरसागर,
सीवुडस्‌ वॉर्ड अध्यक्ष स्नेहल क्षीरसागर, आदिंच्या शिष्टमंडळाने महापालिका सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांना देण्यात आले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आमदार बच्चू कडू यांनी साधला नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद