पाठपुराव्याची फलश्रुती!

 

ऐरोली डीएव्ही शाळा पाठीमागील रस्त्यावर सीसीटिव्ही उभारणीस सुरुवात

नवी मुंबई ः ‘आम आदमी पार्टी'च्या वतीने ऐरोली, सेक्टर-१० मधील डीएव्ही शाळेच्या पाठीमागील रस्ता ते सेक्टर-१४ पर्यंतचा रस्ता या विभागात सीसीटिव्ही लावण्यासाठी करण्यात आलेल्या मागणीची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार कार्यकारी अभियंता (विद्युत) सुनील लाड यांच्या माध्यमातून सदर विभागात सीसीटिव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे.

ऐरोली, सेक्टर-१० मधील डीएव्ही शाळेच्या पाठीमागील रस्ता ते सेक्टर-१४ पर्यंतच्या मार्गात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. तसेच वाहने चोरीचे प्रकार देखील घडत आहेत. यावेळी सोनसाखळी अथवा वाहन चोरांना अटकाव करणाऱ्या नागरिकांवर देखील झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर ह्या पार्शवभूमीवर ‘आम आदमी पार्टी'च्या ऐरोली युनिट तर्फे सदर विभागात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करणारे निवेदन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि कार्यकारी अभियंता सुनील लाड यांच्याकडे देण्यात आले होते. यावेळी ‘आम आदमी पार्टी'च्या नवी मुंबई शहर उपाध्यक्ष मानसी राऊत, प्रीती शिंदेकर, ऐरोली नोड महिला अध्यक्ष आरती सोनावणे, बेलापूर नोड अध्यक्ष महेश क्षीरसागर, ऐरोली नोड अध्यक्ष नामदेव साबळे, चंदन मढवी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


यानंतर ‘आप'च्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याची दखल घेउन महापालिकेच्या वतीने ऐरोली, सेवटर-१० डीएव्ही शाळेमागील रस्ता ते सेवटर-१४ पर्यंत सीसीटिव्ही यंत्रणा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. याबद्दल ‘आम आदमी पार्टी'च्या वतीने महापालिका आयुवत राजेश नार्वेकर आणि कार्यकारी अभियंता सुनील लाड यांना धन्यवाद देण्यात आले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष