ऐरोली विधानसभा मतदारसंघांमध्ये १०० ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचे प्रक्षेपण

"मन की बात' कार्यक्रम  देशासाठी प्रेरणादायी - आमदार गणेश नाईक

नवी मुंबई -:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत वैशिष्ठयपूर्ण आणि क्रांतिकारी उपक्रम ठरलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (रविवारी) देशभर प्रसारित झाला.  आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विधानसभा मतदारसंघांमध्ये १०० ठिकाणी मन की बात कार्यक्रमाचे प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  

 आडवली- भूतवलीमध्ये मन की बात कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसह युवक आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने त्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते.  त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानही लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा, खेळाडूंचा, स्वच्छता दूतांचा, आदिवासी बांधवांना, बंजारा समाजाचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी आणि युवक देशाचे भवितव्य असून तळागाळातील नागरिक आणि आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी याकरिता अडवली-भूतवली येथे मन की बात कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी दिली. मन की बात कार्यक्रम  प्रसंगी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी  महापौर सुधाकर सोनवणे, भाजपा प्रदेश पदाधिकारी वर्षा भोसले, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, स्थानिक माजी नगरसेवक चंद्रकांत डोळे, मुख्याध्यापक सावंत, प्राचार्य प्रताप महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

मन की बात कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या शंभराव्या भागाबद्दल जनतेमध्ये अतिशय उत्सुकता आणि जिज्ञासा होती. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी मन की बातची सुरुवात झाली. आज ३० एप्रिल २०२३ रोजी १०० वा भाग प्रसारित झाला आहे.  

पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम देशातील २३ करोडपेक्षा अधिक नागरिक नियमितपणे ऐकतात. यावरून या कार्यक्रमाची लोकप्रियता किती आहे हे स्पष्ट होते.पंतप्रधान आपल्याला  आपल्या देशातील समृद्ध वारसा, संस्कृती, कला आणि परंपरेच्याजवळ मन की बात या कार्यक्रमातून  घेऊन जातात, अशी प्रतिक्रिया लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी याप्रसंगी दिली.

मन की बात विषयी आपले विचार व्यक्त करताना आमदार गणेश नाईक यांनी देशाची पुढची पिढी सामर्थ्यवान होण्यासाठी पंतप्रधानांनी शैक्षणिक योजना आणल्याचे सांगितले. करोडो लोकांना अंत्योदय योजनेतून मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ दिला.  आयुष्यमान भारत योजनेमधून देशातील सर्व सामान्य नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या संकटातून  देश बाहेर आला. देशाचे लष्कर सामर्थ्यवान केले. देशासमोर सद्यस्थितीतील आव्हानांवर चर्चा करताना त्यावर मार्ग सुचवत असतात.  

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या संकटातून  देश बाहेर आला. देशाचे लष्कर सामर्थ्यवान केले. नव उद्योजक घडवण्यासाठी  मेक इन इंडिया सारख्या योजना आणल्या. पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम हा देशासाठी प्रेरणादायी आहे.

मन की बात कार्यक्रम देशातील करोडो नागरिकांच्या सुखदुःखा बरोबर समरस झालेला कार्यक्रम आहे. जगभरामध्ये या कार्यक्रमाचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामर्थ्यवान भारताची जडणघडण सुरू आहे. - आमदार, गणेश नाईक

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खाजगी सोसायट्यांच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न मार्गी