२ महिन्यापासून पगाराविना ‘एनएमएमटी'चा अपघातग्रस्त वाहक

एनएमएमटी'मधील ठोक मानधनावरील वाहकाला  ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या माध्यमातून १२ हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत 

नवी मुंबई ः नवी मुंबईतील कामगार अडचणीत सापडल्यास अथवा अपघातात जखमी झाल्यास त्याला आणि त्याच्या परिवाराला मदत करण्यासाठी, त्यांना चांगल्यातील चांगले उपचार मिळावेत यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत २४ X ७ या निकषावर सतत धावपळ करत असतात. त्याअनषंगाने ‘एनएमएमटी'मधील ठोक मानधनावरील वाहकावर अपघात होऊन घरी बसण्याची वेळ आली. परिणामी, दोन महिने वेतन न भेटल्याने आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या या वाहकाला कामगार नेते रविंद्र सावंत यांनी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या माध्यमातून १२ हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली आहे.

‘एनएमएमटी'मध्ये ठोक मानधनावर वाहक म्हणून कार्यरत असणारे अकबर मुलानी अपघात झाल्यामुळे दोन महिन्यापासून घरीच होते. या कालावधीत ‘एनएमएमटी'कडून त्यांना वेतनही मिळाले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलानी आणि त्यांचा परिवार आर्थिक संकटात सापडला होता. सदर बाब कामगार नेते रविंद्र सावंत यांना समजताच त्यांनी तात्काळ ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मुलानी यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलानी यांना नेरुळ,
सेक्टर-२ मधील ‘इंटक'च्या कार्यालयात रविंद्र सावंत यांनी बारा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

याप्रसंगी ‘महाराष्ट्र कर्मचारी संघटना'चे अध्यक्ष रवींद्र सावंत, संजय सुतार, राजेंद्र जाधव, अशोक व्यकंट बिराजदार, ‘एनएमएमटी युनिट'चे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल लक्ष्मण चांदणे, नरेश माघाडे, गोविंद गायकवाड, रमेश गायकवाड, प्रकाश भोईर, सुनील दुर्लेकर, विजू राठोड, बाळू भालेराव, इस्माईल सय्यद, सलीम शेख, शाहुराज गायकवाड, धर्मराज वलांडे, रवींद्र सुर्यवंशी, ज्ञानोबा मलकापूरे, राजेश शेल्हाळकर, हरी गायकवाड, भरत झावरे, आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी