विरोधी पक्षनेते दानवे यांनी घेतली पोलीस आयुवतांची भेट

१४ श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करा -अंबादास दानवे

नवी मुंबई ः खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२२ प्रदान सोहळ्यावेळी उष्माघाताने १४ श्री सदस्यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी ‘विधान परिषद'चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २४ एप्रिल रोजी ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली.

दरम्यान, राजकीय पक्षाने एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले, तर पोलीस संबंधित आयोजकांना अटी-शर्ती घालून देत असतात. शेवटी लिहून देत असतात, सदर कार्यक्रमाची सर्वस्वी जबाबदारी आयोजकांची राहील. पण, १६ एप्रिल रोजी जो कार्यक्रम संपन्न झाला, तो महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने केला होता. सरकार या कार्यक्रमाचे आयोजक होते, तर मग १४ जणांच्या मृत्यू प्रकरणी आयोजकांवर पोलिसांनी काय कारवाई केली? असा जाब विचारत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबंधितांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अपमृत्यूचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांच्या कडे केली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी रितसर कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही दानवे यांनी यावेळी दिला आहे.

खारघर येथील कार्यक्रमस्थळी जवळपास २०० ॲम्ब्युलन्स होत्या, त्यामधून रुग्ण आणण्यात आले. रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रत्येक ॲम्ब्युलन्समधून ४ ते ५ रुग्ण आणले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठे तरी रुग्णांची संख्या लपवली जात आहे. काही रुग्णांचा गावाकडे जाऊन मृत्यू झाल्याची शवयताही नाकारता येत नाही. १४ रुग्णांच्या मृत्युची संख्या हास्पिटलाईज झालेल्यांचा आहे. पोलीस या संदर्भात पाहिजे तसे सहकार्य करत नाही. जर एखाद्या विरोधी पक्षाच्या, संघटनेने अथवा संस्थेने कार्यक्रम आयोजित केला असता आणि जर अशी घटना घडली असती तर ताबडतोब त्या कार्यक्रमाच्या आयोजकांवरॲटॅक केला असता. परंतु, महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणी कोणाचीही तक्रार घेतलेली नाही अथवा कुणालाही अटक केलेली नाही, हेच दुर्दैव असल्याचे अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले.

एकंदरीतच या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन त्याचा रितसर तपास करायला हवा. संबंधित अधिकाऱ्यांची मग तो सांस्कृतिक विभागाचा असेल किंवा दुसऱ्या विभागाचा या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. एकीकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी जवळपास १३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हेलिपॅडवर खर्च, एसी हॉलवर खर्च आणि मेजवानीवर देखील भरमसाठ खर्च करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सामान्य माणसाला पिण्याच्या पाण्याची बॉटल नाही, बिस्कीटचा पुडा मिळाला नाही आणि म्हणून दुर्दैवी घटना घडली आहे. याला महाराष्ट्र सरकारचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. त्यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी सूचना अंबादास दानवे यांनी यावेळी पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांना केली.

या भेटीप्रसंगी खासदार राजन विचारे, बबन पाटील, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विल मोरे, द्वारकानाथ भोईर, शिरीष घरत, शहरप्रमुख विजय माने, प्रविण म्हात्रे, आदि उपस्थित होते.

पोलिसांनी संबंधितांविरुध्द कारवाई न केल्यास त्या मृत्यू झालेल्या १४ निष्पाप श्री सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशार पोलीस आयुवत भारंबे यांना दिला आहे. -अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

२ महिन्यापासून पगाराविना ‘एनएमएमटी'चा अपघातग्रस्त वाहक