आ. मंदाताई म्हात्रे यांच्यातर्फे वाशीत मोफत तपासणी शिबीर

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यातर्फे वाशी, सेवटर-२ येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून वाशी, सेवटर-२ येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५५० नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.

‘भाजपा'च्या सौजन्याने आणि लॉयन्स कल्ब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स यांच्या सहकार्याने तर मयुरेश हॉस्पिटल तुर्भे यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी, सेवटर-२ येथे सदर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबेटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच मोफत औषधे, च्यवनप्राश आणि मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री तथा
बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास सोरटे, समाजसेवक जेम्स आवारे, गणेश शिंदे , प्रमिला खडसे, वर्षा झरेकर,मालती सोनी, सुमेध पालवे, विशाल साबळे, लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स अध्यक्ष प्रताप मुधलियार, डॉ. अनिकेत सोनावणे, संदीप सुर्यवंशी, रिना अग्रवाल, मोहन कालबेरे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाशी, सेवटर-२ येथे आयोजित सदर महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहून समाधान वाटले. या शिबिराच्या आयोजनासाठी वाशी येथील अनेक सहकाऱ्यांनी मदत केली. शिबिरात मोठ्या संख्येने सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करुन घेतली, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पाणी समस्येविरोधात ‘मनसे'चे अनोखे आंदोलन ; पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर दर्शविणारे होर्डिंग