नेरुळमधील प्रभाग क्र. ३१ मधील शिवसेना शाखेच्या वतीने विविध वयोगटातील मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने नेरुळमध्ये विविध स्पर्धां संपन्न 

तुर्भे : नेरुळमधील प्रभाग क्र. ३१ मधील शिवसेना शाखेच्या वतीने मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध वयोगटातील मुलांसाठी निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. भावी आयुष्यात मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्या उपजत कला गुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिवसेना शाखेच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे उपशहर प्रमुख गणेश घाग यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

यावेळी १ ली ते ५ वी वयोगटात  कु.साजवी साळुंखे हिने कलागुण व चित्रकला स्पर्धेत प्रथम तर वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय अशी तीन बक्षीस पटकावली. तिन्ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाखा प्रमुख राजेश पुजारी, उपशाखा प्रमुख दासा भोसले यांनी मोठे योगदान केले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, उपशहर प्रमुख गणेश घाग, महिला उपशहर संघटक रेश्मा वेंगुर्लेकर आयोजक व उद्योजक हरिश इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पक्ष प्रवक्ते तथा ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख नरेश म्हस्के यांचा जाहिर सत्कार