‘काँग्रेस ओबीसी विभाग'चे जिल्हाध्यक्ष संतोष सुतार याचे कोकण आयुवतांना निवेदन

ओबीसी समाजाच्या विविध मागण्या मान्य करा; अन्यथा आंदोलन

नवी मुंबई ः ओबीसी समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा शासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी-ओबीसी विभाग'चे अध्यक्ष संतोष सुतार यांनी कोकण विभागीय आयुवतांकडे निवेदनाद्वारे दिला आहे. जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात यावी, बिहार राज्याप्रमाणे ओबीसींची जात निहाय जनगणना महाराष्ट्रात करण्यात यावी, ओबीसी मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजाशी संलग्न विविध महामंडळाची कर्जे माफ करुन शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरित मागे घ्याव्यात, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा,

निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर बंद करण्यात यावा, महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुरु करण्याच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या संतोष सुतार यांनी कोकण विभागीय आयुवतांना दिलेल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. ओबीसी समाजाच्या सदर मागण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन उचित कार्यवाही करावी. तसेच मागण्यांची पुर्तता न झाल्यास येत्या १५ मे २०२३ पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागामार्फत आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष सुतार यांनी सदर निवेदनाद्वारे दिला आहे.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती