दिवागांव, सेक्टर-९ सर्कल जवळील जागा मासे विक्रीसाठी मिळावी यासाठी मासळी विक्रेत्यांचे आंदाेलन

दिवागांव मच्छी विक्रेत्यांच्या हक्काच्या जागेसाठी ‘आप'चे आंदोलन

नवी मुंबई ः दिवागांव स्थानिक कोळी बांधव आणि त्यांची पुढील पिढी मासळी विक्रीचे काम करुन या व्यवसायावर त्यांचे पोटपाणी, मुलांचे शिक्षण, जीवन जगणे अवलंबुन आहे. त्याअनुषंगाने दिवागांव, सेक्टर-९ सर्कल जवळील हक्काची जागा मिळावी यासाठी येथील मासे विक्रेत्यांची मागणी बऱ्याच वर्षापासून असून त्यासाठी त्यांची कायदेशीर लढाई सुरु आहे. दिवागांव येथील मच्छी विक्रेतांना हक्काची जागा मिळाली पाहिजे, जर हक्काची जागा मिळाली तरच कोळी बांधव जगेल अशी ठाम भूमिका घेऊन ‘आम आदमी पार्टी, नवी मुंबई'तर्फे दिवागांव सर्कल येथे १२ मार्च रोजी आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनकर्त्यांनी हस्ताक्षर मोहिम देखील राबवली.

दिवागांव, सेक्टर-९ सर्कल जवळील जागा मासे विक्रीसाठी मिळावी अशी मासळी विक्रेत्यांची मागणी मासे असून त्यांची मागणी पूर्ण व्हावी यासाठी ८०-९० मच्छी विक्रेत्यांनी हस्ताक्षर करुन या आंदोलनाला समर्थन दिले. यावेळी ‘दिवा कोळीवाडा मच्छीमार सेवा संस्था'चे अध्यक्ष चंदन मढवी यांनी ‘आम आदमी पार्टी'मध्ये प्रवेश केला. चंदन मढवी यांच्या ‘आप' प्रवेशासाठी ‘आप'च्या नवी मुंबई उपाध्यक्षा प्रिती शिंदेकर, मिलींद तांबे, समन्वयक देवराम सुर्यवंशी, कुलविंदर सिंग बिन्द्रा, नामदेव साबळे, आरती सोनवणे, गायत्री तांबे, नीना जोहरी, देविदास पाटील, अरुण सोनी, शंकर पाटील आदिंनी परिश्रम घेतले. तसेच आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला. 

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

नेरुळ मध्ये दोन दिवसीय महिला मेळावा संपन्न