नवी मुंबई मनसेला भगदाड

नवी मुंबई मनसे शहर उपाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र 

नवी मुंबई : मनसेचे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांचे महानगरपालिकेत आर्थिक हितसंबंध असल्यामुळे अधिकारी आमच्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप करत आपण पक्षाला जय महाराष्ट्र करीत आहोत.असे मत शहर उपाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्षांसह ५ पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. नवी मुंबई मनसे पदाधिका-यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबईत नेतृत्वबदल करण्याची पदाधिका-यांची मागणी होत आहे. प्रसाद घोरपडे बोलताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी पदावर असल्यापासून मला अंतर्गत बाबींमध्ये त्रास द्यायचा प्रयत्न सुरू होता. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत सांगितले. त्यासंबंधी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेच्या नवी मुंबई उपशहर अध्यक्षपदाचा राजीनामा मी वरिष्ठ नेत्यांकडे सोपवला आहे.तर या आधी गजानन काळे यांच्यावर पैसे घेऊन  महापालिकेत कामगारांना नोकरी वर लावल्याचा  तसेच अधिकाऱ्यांना धमकावून वसुली केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी मागील वर्षी  केला होता.मात्र त्यावेळी पक्षाने काळे यांची पाठराखण केली होती.त्यामुळे प्रसाद घोरपडे यांनी केलेल्या  आरोपांनंतर पक्षश्रेष्ठी  काळे यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात ?हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिवागांव, सेक्टर-९ सर्कल जवळील जागा मासे विक्रीसाठी मिळावी यासाठी मासळी विक्रेत्यांचे आंदाेलन