महिला दिनाचे औचित्य साधून महिला रिक्षा चालकांचा ‘आप'तर्फे सत्कार

‘आप'तर्फे महिला रिक्षा चालकांचा सत्कार-पक्ष प्रवेश

नवी मुंबई ः टीम आप नवी मुंबई तर्फे, दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची प्रथा आहे. त्याअनुषंगाने यंदा महिला दिनाचे औचित्य साधून महिला रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, ‘आप-नवी मुंबई'तर्फे पूर्वी पासून १५ ऑगस्टचे ध्वजारोहण महापालिकेच्या सफाई कामगार महिलेतर्फे करण्याची प्रथा सुरु करण्यात आलेली आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत नवी मुंबईच्या सर्वच प्रभागातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणावर ‘आप'मध्ये सामील होत आहेत. सदर रिक्षा चालक महिला सत्कार आणि पक्ष प्रवेश समारंभ कोपरखैरणे, सेवटर-२३ मधील शांतिदूत महावीर उद्यान येथे संपन्न झाला. यावेळी सुजाता पाटील, सावित्री डांेगरे, रवाना मुलानी, ज्योती राठोड, रेश्मा शुवला, संजना चव्हाण यांच्यासह ४०हुन अधिक महिला रिक्षा चालक महिला सहभागी झाल्या होत्या.

सदर सत्कार समारंभाच्या नियोजनासाठी ‘आप'च्या जिल्हा सहसचिव नीना जोहरी, आप-कोपरखैरणे टीम मधील  किरण कुंदारे, छगन पटेल, मधू चावला, आरती सिंग आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घ्ोतली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई मनसेला भगदाड