विचारांचे सामर्थ्य

कोणी लिहिलं होतं कधी कधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसे वागतात आपण पण तसं वागावे. पण नंतर मनात एक विचार येतो, आपणही त्यांच्यासारखं वागले तर त्यांच्यात नी आपल्यात काय फरक? हा विचार वाचला आणि मला उत्तर द्यायचे मन झाले.

खरं आहे; पण कधी कधी आपल्या अशा चांगुलपणाचा नकारात्मक माणसं खूप फायदा उचलतात. आपल्यात  आणि त्यांच्यात फरक असला तरी कोणाला आपला सारखा सारखा अपमान होऊ देऊ नका.  अशा वेळी त्यांना चांगलं-वाईटची समज द्या. कदाचित त्यांना परिस्थिती नुसार चांगले संस्कार आणि चांगली वागणूक मिळाली नसणार म्हणून त्यावेळी त्यांना जी वागणूक आणि संस्कार मिळाले तसे ते घडले आणि म्हणून ते दुसऱ्यांनाही तशी वागणूक देतात.

मात्र ज्याच्या त्याच्या विचारांवर निध्राारित आहे. त्यांच्यात चांगला बदल घडवण्याचा आणि चांगले संस्कार देण्याचा नक्कीचं आपण प्रयत्न करावा. स्वयं परिवर्तन घडले की सकारात्मक विचारांची वाटचाल आपोआप घडते आणि तशी कृतीही घडते.चांगले विचारांचे मनन, चिंतन करावे व ते आचारण्यात आणण्याचे प्रयत्न करावे. त्याने मानवी संस्कृतीचे चित्रंच बदलून जाते.

कारण ‘विचारांचे सामर्थ्य' फार मोठे आहे. विचारांनीच तर माणूस घडतो. पहा ना..फुल कितीही सुंदर असू देत. कौतुक त्यांच्या सुगंधाचे होते; तसेच माणूस कितीही मोठा असू दे, कौतुक त्याच्या गुणांचे होते आणि याच गुणांमुळेच त्या सुगंधित फुला बरोबरच गुणवंत माणसांचीही समाजात गरज निर्माण होते.

मात्र प्रयत्न करूनही जर त्यांच्या स्वभावात बदल घडत नाही तेव्हा त्यांना सावधान करा. जरी सावधान करूनही ते तसेच वागत राहिले तर समजावे. हा त्यांच्या वागण्याचा पिंड आहे आणि त्यांच्या नकारात्मक पिंडात आपण कधीही बसू शकत नाही.

अशावेळी सकारात्मक माणसांनी त्यांच्या आत्म्याला माफ करावे आणि आपली दिशा बदलावी.त्यांच्या मार्गात जाऊ नये .त्यांचे वाईट चिंतन कधीही करू नये. पण त्यांच्यात राहू नये. ज्याने आपले अस्तित्व काय आहे आणि आपल्याला काय करायचे आहे ह्याचा दृष्टिकोन आपला स्पष्ट होतो. भावनाही दुःखत नाही आणि कार्यही सकारात्मक घडते .
-स्मिताक्षी सूर्यकांत चिपळणूकर-आंबेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गुरुंचे मार्गदर्शन