तुम बहोत याद आए
सन ७२ पासून लिहायला सुरूवात केली खरी, मात्र दिशा कळत नव्हती. माझ्या नात्यातला मामा उर्दु शायरी करत असे. मुशायरा ही गाजवत होता म्हणे...
हसीन दिलकश मनाजरो मे
मैं डूब जाने की सोचता हूं
लतीफ नगमें बिखर रहे हैं
रबाब उठाने की सोचता हूं
वय वर्ष २२, मी आणि मित्र अशोक बगाडिया एक हिंदी सिनेमाचा मॉर्निंग शो पाहण्यास इरोस टॉकीजमध्ये गेलो होतो. सिनेमा पाहून बाहेर आलो, तर तो आपल्या मार्गे निघून गेला... काहीं न बोलता. मी सुध्दा निःशब्द झालो...आपल्या घरी निघून आलो. पुढे एकाच वर्गातले लेक्चर्स अटेंड करत होतो, मात्र आमच्यात नकळत का कुणास ठाऊक कमालीचा अबोला आला. का? ते तेव्हां नाही कळले. नंतर काही दिवसांनी आम्हीच एकमेकांशी बोलतेही झालो. मात्र पाहिलेल्या सिनेमावर काही बोलायचे टाळत राहिलो. कॉलेज मध्ये राष्ट्र सेवा दल ही आमची दिशा होती. व्यक्त होण्याची ती पहिलीच नैर्सागिक वेळ असावी असे आम्हा दोघांनाही वाटू लागले. दोघांचे लिखाण हिंदीतले. (मी स्वतः मराठीत ही काव्य लिहायचो) दोघेही खूप-खूप जुनी अतिशय दुःखी अशी गाणी एकत्र ऐकायचो. मी तर मुलींमध्ये टेप रेकॉर्डर म्हणून त्या टेर घेत असत. अशोक आणि मी जो सिनेमा पाहण्यास गेलो होतो तो सिनेमा ही तसाच नैराश्य व्यक्त करणारा होता...कागज के फूल....दुःख सेलिब्रेट करण्यास सांगणारा तो सिनेमा!
गुरू दत्तचा तो आत्माविष्कार असावा एव्हढा गुरू त्या भूमिकेत एकरूप झाला असावा. त्या सिनेमाने तत्कालीन अनेकांना दुःखाची परिभाषा समजून घेण्यास भाग पाडले असावे. आदमी की लाश कभी देखी नही क्या...!! हे सिनेमातले ते शेवटचे वाक्य एकूणच निराश करून गेलं, आम्हा दोघांना. नंतर आम्हीं दोघानी प्यासा हा सिनेमा पाहिला. पुन्हा तोच गुरू, तीच ती त्याची उदास छबी, भरून आलेले डोळे... पण अश्रंूना कमालीची शिस्त लावलेली! मजाल है एक आंसू भी टपक जाए!
साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली गीते ज्यांस सचिन देव बर्मन यांनी स्वरसाज सजवलेला. सर्वच्या सर्व गाणी अर्थपूर्ण, मेलडीपूर्ण...गीता रॉय-दत्त यांचा मखमली स्वर. सबकुछ लाजवाब! मेरी सारी शायरी की किताब का सिर्फ १० आने मोल? समाजातील दांभिकतेवर सटिक रोष व्यक्त करणारा गुरु... त्याने निभावलेल्या प्रत्येक भूमिकेतून तो कायम व्यक्त होत राहिला.मिस्टरर् मिसेस ५५ या विनोदी चित्रपटातील भूमिकेतून गुरू कार्टुनिस्ट आणि कम्युनिस्ट या विषयाचे विश्लेषण करतांना एकीकडे प्रेक्षकांना हसायला लावतो; तर दुसरीकडे चाहत्यांना अंतर्मुख व्हायला लावतो...त्या दोन शब्दांपलिकडे त्यांचा भावार्थ काय असावा? अशा भूमिकेतून दिसणारा गुरुदत्त हा तेव्हांपासून माझा अभिव्यक्त होण्याचा नकळत सच्चा मार्गदर्शक गुरू ठरला. हिंदी-मराठीतील अनेक मान्यवरांची पुस्तकें वाचत होतो, मात्र लेखणी हातात घेण्याचे धैर्य गुरुदत्तच्या प्यासा मुळे आलं, हे आज कळतंय!
उम्मीद की किरन पे
एतबार कर
तू अपने शुगल को
रास्ता बना ले
आहों से आवाज भरी सांसोसे
तुम्हें बुलाया
अंतर में गेहरे उतरे तुम जितना तुम्हें भुलाया...
माझा परम मित्र अशोक कुमार ‘दाग' असंच कांही लिहू लागला. एव्हाना त्याने ‘दाग' हे टोपण नांव स्वतःला देऊ केले. कॉलेजात धोती-कुर्ता अशा वेषात येणारा तो एकमेव विद्यार्थी असेल, राजेश खन्नाच्या युगातला!
आहों से आवज भरी
सांसों से तुम्हे बुलाय
अंतर मे गहरे उतरे तुम
जितना तुम्हे भुलाया
जीवन मे सुनापन पनपा
मन खोया/खोया है
खारे जल की बुंदों से
मधूमय मुखडा धोया है
पीडा जागी रोई तो
गीतों से उसे सुलाया
चैन दिवस का निंद रात की
चोरी तुमने मेरी
अधर लरजते पलकें भारी
बाट जोहते तेरी
तुनेही निंद चुराई
तुमने मुझे रुलाया
मी सुध्दा वेगळा विषय घेऊन काव्य रचू लागलो.
प्रभात की लालिमा है छाई
मुझे तुम्हारी....याद आई
पुढे मुक्तपणे मी सुद्धा हिंदीत लिहू लागलो...मराठी माध्यमातून आलेला विद्यार्थी...
तुम इतना भी ना चाहो
कि चाह की डोर टूट जाय
बिछुडने से करुणा
असहाय हो जाय
तुम, यह ना समझना
निराशवादी हुं मैं
आस-निरास का विवाद
नही है...
चाहा है मैने तुम्हे
मांग के पालेना
अपनी आदत नही
त्यावेळी आमचा एक सोशल गृप होता, त्यामध्ये मी अशोकची गीतं तसेच स्वरचित गाणी सादर करू लागलो. माझ्या स्वलिखित मराठी-हिंदी कविता आकाशवाणीवरून सादर करू लागलो. मित्रांमध्ये माझी ओळख फार वेगळी होऊ लागली. कॉलेज पूर्ण करून अशोक दिल्लीत निघून गेला. मुंबई मलाही तितकीशी भावत नसे. जरी विदेशात गेलो होतो तरी लेखणी तिकडे ही सुरू होतीच... मयूर पंख, बस्ती उस पार की, अचेत, मर्म या सारखी पुस्तके विदेशातच लिहिली व ती त्या-त्या वेळी राज पब्लिशिंग हाऊस-पुरानी दिल्ली तर्फे वाचकांपर्यँत येऊ लागली. आज त्यातील तीन नोव्हेलेट्स मिळून ‘बात वही मुलाकात नयी' या नावे एकाच पुस्तकी संचात हंस प्रकाशन- नई दिल्लीहून प्रकाशित झाले आहे. जे ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. वाचकांनी जरुर लाभ घ्यावा.
पुढ आणखी एका कॉलेज मित्रामुळे (अवतार पोदार) माझी ६ हिंदी गीतं असलेली कॅसेट १९८६ ला रिलीज झाली. गीतकुंज असं त्या कॅसेटचे नांव होते. त्यांतील काही गाणी यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
आता मी स्वतः सत्तरीत आहे. मी लिहिलेली हिंदी-मराठी भाषेतील अनेक पुस्तके गुगलवर उपलब्ध आहेत. आज पुन्हा एकदा अशोक कुमार दाग आठवतो. ..आणि ज्याच्यामुळे मी लिहिता झालो त्या अमर कलाकाराची म्हणजेच गुरुदत्तची याद येते. त्या दोघांचा मी मनस्वी ऋणी आहे.
शेवटी एक प्रश्न असून नसून मनाला छळत असतो...आपला गुरू म्हणजेच गुरुदत्त एव्हढ्या लवकर जायला नको होता..पण हाच प्रश्न मी माझ्या आई विषयीं विचारला असता कुणी तरी उद्गारले...
जो खुदा को बहोत भाते हैं, उन्हे खुदा जल्द ही अपने पास बुलाते है
खरंच गुरू होताच तसा, मान गए गुरू तुझी EXIT सुद्धा थेट काळजाला जाऊन भिडली रे...तू नसलास तरी तुझे सिनेमे आहेत, तेच मार्गदर्शक ठरतील हे निर्विवाद. कसल्या तरी अनाकलनीय शोधात आयुष्यभर दुःख सोसणारा तो गुरुदत्त नकळत माझा गुरू झाला, हे सत्य आहे. - इकबाल शर्फ मुकादम, तळोेजा