बिघडत चाललेले पुणे

औद्योगिकीकरणामुळे तरुणांच्या तथा त्यांच्या पालकांच्या हातात सहजरीत्या पैसा खुळखुळतो आणि पालकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व मुलांना पालकांकडून दिल्या जाणाऱ्या अतिरेकी स्वातंत्र्यामुळे मुले आणि मुली ड्रग्स ॲडिक्ट, व्हिस्की ॲडिक्ट बनलेली आहेत. श्रीमंत आईबापांची उनाड बालके तर ड्रग्सपासून तर सगळ्या प्रकारच्या नशा करत आहेत आणि पालकांना माहिती नाही. जेव्हा पालकांना माहिती होते तेव्हा वेळ गेलेली असते. एका आकडेवारीनुसार पुण्यामध्ये जितके पुरुष व्यसनासवत आहेत तितवयाच महिलाही व्यसनासवत आहेत. म्हणजे एकंदरीत मुली येथेही मागे राहिल्या नाहीत हे धक्कादायक वास्तव आहे.

तीन महिन्यांपूर्वी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन हजार कोटीचे ड्रग्स पकडले आणि एकच खळबळ उडाली होती. त्या बातमीची राजकीय बातम्याकडे लक्ष देणाऱ्या कॉमनमॅनकडून दखल घेतली गेली नाही. राजकारणाच्या चिखलात माणुस एवढा डुंबलाय की त्याला आपल्या भोवताली काय घडतय याचे भान राहिले नाही. माझाच नेता कसा श्रेष्ठ त्याचा कसा कनिष्ठ या युक्तीवादात त्याला रोजच्या जगण्याशी असलेल्या संवेदनशील विषयांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपला भवताल काय बोलतोय? निसर्गात काय चाललंय? पाउस पडेल का नाही? मित्र-नातेवाईक काही अडचणीत आहेत का याची आपण किती दिवस चौकशी केली नाही याचे आत्मपरीक्षण करायची गरज आहे. सोशल मिडियाच्या व्हर्चुअल रिॲलिटीमध्ये माणुस जेव्हापासून जगायला लागलाय तेव्हापासून तो भवताल विसरलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मी गेली दोन वर्षापासून सोशल मिडियाच्या वापरावर फार नियंत्रण मिळवलंय. काही व्यावसायिक अपवाद वगळले तर मी सोशल मिडिया वापरत नाही.  त्यातुन मला इतर गोष्टींचा आनंद घेता येतो. आता हेच पहा सकाळी उठल्यावर मी काही वेळ आपल्या मित्रांसाठी देतो. माझे मित्र म्हणजे मोर. आमच्या डोंगराच्या कडेला ते चारा खाण्यासाठी येतात. या कडाक्याच्या उन्हाळ्यात त्यांना पाण्याची सोय नाही. तहानेने व्याकूळ होतात. मी त्यांच्यासाठी एका टेंपररी बनविलेल्या हौदात पाणी भरुन ठेवतो. दररोज सकाळी ते पाणी पिताना दिसतात त्यातुन आनंद मिळतो. आपण प्रत्येकाने मुक्या जिवांसाठी असं काहीतरी करा. असो; आपण मुळ मुद्याकडे येऊया. तर पुण्यात ड्रग्ज पकडलं होतं यावरून पुणे शहराची भविष्यातील दिशा स्पष्ट होत आहे. नुकताच एका धनदांडग्याच्या अल्पवयीन मुलाने एका जोडप्याला लक्झरी कार २२० किलोमीटर प्रतितास या वेगाने चालवत चिरडलं. ती दुर्दैवी मुलगी जमिनीपासून २० फुट हवेत भिरकावली गेली. अपघात इतका भयानक होता की पोर्शे या दोन करोड किंमत असलेल्या लक्झरी स्पोर्ट्‌स कारच्या ६ च्या सहा एअरबॅग्ज उघडल्या होत्या. यावरुन त्याची भीषणता लक्षात येते. हा ॲक्सिडेंट ड्रंक ॲण्ड ड्राईव्हमुळे झाल्याचे स्पष्ट आहे पण त्यात दोन निष्पाप व्यक्तींना आपला जीव हकनाक गमवावा लागला. एकेकाळी विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्याचे कल्चर आता पब्स, रेस्टॉरंट, बार, नाईट लाईफ इकडे आपसूक वळले आहे. ते का वळले याला औद्योगिक, आर्थिक सामाजिक कारणे असली तरी सुज्ञ पुणेकर म्हणून त्याला प्रतिबंध घालण्याची जबाबदारी पुणेकरांची आहे.

सहज उपलब्ध होणारा पैसा, मुलांचे मुबलक लाड, आपल्या मुलांवर काय संस्कार होत आहेत हेही आपण पाहत नाहीत. आपली मुले रात्री कोणासोबत बसतात उठतात, त्याची मित्र कोण आहेत याकडे पालकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यातून काल-परवाचा दुर्दैवी प्रकार घडला. यामध्ये सिस्टीम फेल्युअर तर आहेच; पण सिस्टीमचा रोल प्रकरण जस्टिफाय करण्यापर्यंत आहे. सिस्टीम किती विकाऊ आहे हे यनिमित्ताने दिसले. हा हिंस्त्र क्राईम असला तरी धनदांडग्याचा पोरगा असल्यामुळे त्याला त्यानुसार शिक्षा होईल का, की चार दिवस शोक व्यक्त करून जनतेच्या भावना शांत झाल्या की पैशाची तडजोड करून प्रकरण मिटविले जाईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही. कारण एका चित्रपटात संवाद आहे. यहाँं सुबकुछ बिकता है, लेकिन खरिदनेवाला चाहिये. भारताच्या न्यायव्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे बैलाकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. आपण डोळे बंद केलेले आहे. पुण्यातील नाईट लाईफ अत्यंत भयावाह आहे. संस्कृती, देश, धर्माच्या चिंधड्या उडविणारे आहे. इलेक्शन सर्वेच्या निमित्ताने पुण्यातील प्रत्येक हायप्रोफाइल एरियात जाता आलं.  त्यावेळी पाहिलेलं आणि अनुभवलेलं वास्तव अत्यंत वेदना देणारं आहे. तरुण मुलामुलींच्या पब्समधील पार्ट्या रात्री चार-चार वाजेपर्यंत चालतात. तोपर्यंत बार, पब्स आणि त्यांचा नंगानाच चालू असतो. प्रचंड प्रमाणातील औद्योगिकीकरणामुळे तरुणांच्या तथा त्यांच्या पालकांच्या हातात सहजरीत्या पैसा खुळखुळतो आणि पालकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व मुलांना पालकांकडून दिल्या जाणाऱ्या अतिरेकी स्वातंत्र्यामुळे मुले आणि मुली ड्रग्स ॲडिक्ट, व्हिस्की ॲडिक्ट बनलेली आहेत. श्रीमंत आईबापांची उनाड बालके तर ड्रग्सपासून तर सगळ्या नशा करत आहेत आणि पालकांना माहिती नाही. जेव्हा पालकांना माहिती होते तेव्हा वेळ गेलेली असते. एका आकडेवारीनुसार पुण्यामध्ये जितके पुरुष व्यसनासवत आहेत तितवयाच महिलाही व्यसनासवत आहेत. म्हणजे एकंदरीत मुली येथेही मागे राहिल्या नाहीत हे धक्कादायक वास्तव आहे. मी सर्वेसाठी पुण्यामध्ये असताना कोरेगाव पार्क येथे आमची राहण्याची व्यवस्था होती. पाहिले दोन दिवस अत्यंत प्रसन्न वाटले. प्रशस्त आणि ऐसपैस बंगले, निवांत वातावरण, रस्त्याच्या दुतर्फा आणि इमारतीच्या परिसरात असलेल्या सुंदर वनराईमुळे अत्यंत स्वच्छ सुंदर हवा होती. उच्चभ्रू लोकांचा हा परिसर म्हणून हा परिसर ओळखला जातो. ब्रिटिश सरकारच्या काळात सर्व उच्च अधिकाऱ्याचे राहण्याचे आवडते ठिकाणी कोरेगाव पार्क परिसर होते. तर तीन दिवसांनंतर मात्र मला तेथील पब्स, बार आणि नाईट लाईफच्या भीषण वास्तवाने मन व्यथित झाले. दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या हेरिटेज बिल्डींगच्या शेजारच्या बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री साधारण १ वाजता पाणी पिण्यासाठी म्हणून उठलो आणि गॅलरीत आलो त्यावेळी पाहिलेलं वास्तव धक्कादायक आणि मन व्यथित करणारे होते. एका लक्झरी कारमधील चारही मुली कार रस्त्याच्या कडेला लावून खाली उतरल्या होत्या. त्या प्रचंड नशेच्या अंमलाखाली होत्या. त्यांना धड चालता आणि बोलता येत नव्हते. त्या एकमेकींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होत्या. मी बराच वेळ त्यांच्या हालचालींचे निरीक्षण केले. त्यावेळी पुण्याचं बिघडलेलं कल्चर लक्षात आलं. याच्या विविध बाजू असल्या तरी समाज म्हणून एक सजग पालक म्हणून आपणही तितकेच जबाबदार आहोत. आपल्या पिढीने जे चटके सोसले, खस्ता खाल्या त्या आपल्या मुला-मुलींच्या वाट्याला येऊ नये ही प्रत्येक पालकांची इच्छा असणे स्वाभाविक आहे; पण त्यामुळे त्यांना कष्टाचं महत्त्व समजू नये इतका अतिरेकी लाड करू नये. सोशल मिडीयाच्या अतिरेकी वापर, अतिरेकी लाड,  पालकांचे दुर्लक्ष, सहज मिळणारा पैसा यामुळे अनेक मुलामुलींचे आयुष्य बरबाद झाले आहे. यासाठी प्रत्येक पालकाला सोशल रिफार्मर बनावे लागेल. माझ्या माहितीतले एक पालक आहेत. परिस्थिती निम्नवर्गीय.. पण मुलांचे लाड इतके की प्रसंगी उन्हातान्हात कामाला जायचं; पण मुलांना काही बोलायचं नाही. मुलांना दिवसभर झोपायची सवय. तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलामुलींना संघर्षाची सवय लावली तरच तो खऱ्या अर्थाने यशस्वी माणुस होईल. अन्यथा पुण्यातील अगरवाल यांच्या मुलासारखे अवस्था होईल यात वाद नाही. अगरवाल पैसेवाला आहे. बिगरपैसेेवाल्यांची अवस्था कशी होईल हे सांगायला कुठल्या ब्रम्हदेवाची गरज नाही. त्या दोन निष्पाप व्यवतींना न्यायदेवतेकडुन न्याय मिळावा एवढीच अपेक्षा. - दत्ता पवार 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी