आता प्रतिक्षा ४ जूनची!
महाराष्ट्रासह अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ल़ढती असून तेथील निकालही अपेक्षित, अनपेक्षित की धवकादायक लागतील हेही निकालातून स्पष्ट होणार आहे. येत्या २५ मे आणि २ जून या दिवशी अखेरच्या दोन टप्प्यातील मतदान होईल आणि ४ जूनला ५४३ मतदारसंघांचा निकाल जाहीर होईल तेव्हा देशात काय घडले याचे उत्तर मिळेल, त्यामुळे तूर्त तरी प्रतिक्षा ४ जूनची!
देशाच्या लोकसभेतील ५४३ जागांसाठी देशभरात ७ टप्प्यांत निवडणूक होत असून मतदानाचे पाच टप्पे पार पडले आहेत. येत्या २५ मे रोजी आणि २ जून रोजी मतदानाचे अनुक्रमे ६ व ७ टप्पे पूर्ण होत निवडणूक प्रक्रिया संपुष्टात येईल आणि प्रतिक्षा असेल ती ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक पार पडली असून अन्य दोन टप्प्यांत देशातील अन्य प्रांतांतील काही मतदारसंघांम़ध्ये निवडणूक पार पडेल. तथापी देशात निकाल कसा लागेल? याबाबत कमालिची उत्सुकता असून ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला नेमवया किती जागा मिळतील? देशात भाजप सत्ता राखेल काय? इंडिया आघाडीची धाव कुठपर्यंत असेल? महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे घटक असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, शरदश्चंद्र पवार राष्ट्रवादी कांँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आय या पक्षांना किती जागा मिळतील? निवडणूक प्रचारकाळात महाराष्ट्रात इंडिया आघाडीने भाजपसह महायुतीविरोधात जोरदार प्रचार केला. इंडिया आघाडीच्या सभांना अनेक ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. महायुतीत मनसेचा सहभाग करुन घेण्यात भाजपचे शीर्षस्थ नेते यशस्वी झाले आणि या मनसे निर्णयाचे विविध पडसाद राज्यात उमटल्याचेही पहावयास मिळाले. त्यामुळे जिथे मनसेचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येते तेथे हा फॅवटर किती चालला, त्याचा फायदा महायुतीला खरेच झाला काय? याचाही अंदाज निकालातील मत आकडेवारीतून येऊ शकेल.
प्रचार काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शहा यांनी मु़ंबईसह महाराष्ट्रात सभा घेतल्या. त्यांच्या सभांचा आकडा आणि एकूणच बाज पाहता त्यांनी महाराष्ट्राला किती महत्व दिले हे जाणवते, किंबहुना ४८ पैकी ४० हून अधिक जागा महायुती जिंकणार असा विश्वास बाळगणाऱ्या या पक्षाने इंडिया आघाडीला एवढे महत्व का द्यावे? विरोधका़ंना कमी लेखू नये हे खरेच, मात्र देशात ४०० पार आणि राज्यात ४८ पैकी ४० हून अधिक जागा महायुती जिंकणार असा दावा करणाऱ्या भाजपने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी मोठी शिकस्त का करावी लागत आहे? असेही प्रश्न राजकीय जाणकार विचारत आहेत. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जिंकण्याबाबत अति आत्मविश्वास खरेच वाटत होता की विरोधकांची भीती कायम वाटत होती? या सारख्या प्रश्नांची उत्तरेही निकालातून मिळणार आहेत.
लोकसभा निवडणूक प्रचार काळात इंडिया आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करताना देशातील लोकशाही धोवयात आली असून ते देश हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप करण्यात आला. तो खरा आहे, हे पटवून देण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून काही उदाहवरणे दिली गेली आणि गायीइऐवजी महागाईवर बोला, असे थेट आव्हानच उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना केले. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून भाजपने मोठी चूक केली असून याबाबतची सहानुभूती महाराष्ट्रातील जनतेत असून त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असे जनमत असल्याचे सांगण्यात येऊ लागले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट या प्रकरणाकडे राज्यात अत्यंत गांभीर्याने पाहिले जात असून असे मुद्देही या निवडणुकीत गाजले. याचाही खरेच किती फरक पडेल, हेही निकालातून दिसून येईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट ही बाब महाराष्ट्रापुरती मर्यादित असली तरी देशपातळीवर अत्यंत लक्षवेधी घटना म्हणून पाहिली जात असल्याने किमान राज्यात तरी या दोन्हीसह काँग्रेस पक्षलाही किती यश मिळते हे पाहणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर भाजपची धोरणे जनतेला देश पातळीवर पटतात का? याचाही हिशेब मतदान निकालातून कळणार आहे. या शिवाय महाराष्ट्रासह अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ल़ढती असून तेथील निकालही अपेक्षित, अनपेक्षित की धवकादायक लागतील हेही निकालातून स्पष्ट होणार आहे. येत्या २५ मे आणि २ जून या दिवशी अखेरच्या दोन टप्प्यातील मतदान होईल आणि ४ जूनला ५४३ मतदारसंघांचा निकाल जाहीर होईल तेव्हा देशात काय घडले याचे उत्तर मिळेल, त्यामुळे तूर्त तरी प्रतिक्षा ४ जूनची! - रामनाथ चौलकर