नेरुळ आणि जुईनगर नोडमधील नागरी समस्यांचे निवारण करण्याची नवी मुंबई जिल्हा काँग्रेसची मागणी

नेरुळ मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी

नवी मुंबई ः नेरुळ आणि जुईनगर नोडमधील नागरी समस्यांचे निवारण करण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रवक्ते तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनातून केली
आहे. नेरुळ आणि जुईनगर नोड सह इतर ठिकाणच्या नागरी समस्यांसंदर्भात कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीवेळी रविंद्र सावंत यांनी नेरुळ आणि जुईनगर नोडमधील
समस्यांबाबत आयुवतांना  निवेदन सादर केले.

नेरुळ, सेक्टर-४ ते सानपाडा (वाधवा टॉवर ते पामबीच मार्गालगत असलेले केसर सॉलिटर) दरम्यान सर्व्हिस रोड तयार करणे. नेरुळ स्टेशन पश्चिमेस पदपथावर भिकारी आणि इतरांनी निवासी वास्तव्य बनविले आहे. यामुळे स्टेशन परिसराला बकालपणा आला असून ‘स्वच्छता अभियान'ला गालबोट लागले आहे. स्टेशन बाहेरील भिकाऱ्यांचे पदपथावरील वास्तव्य हटवून येथील बकालपणा नष्ट करावा. त्या ठिकाणी कुंड्या ठेवून सुशोभिकरण करण्यात यावे. महापालिका आणि सिडको या कामासाठी हद्द असे कारण सांगत टोलवाटोलवी करत आहेत. महापालिका आयुवत ‘सिडको'चे पदसिध्द संचालक असल्याने आपण याकामी पुढाकार घ्यावा. सेक्टर-४ आणि ६ मधील चौकात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात यावा. येथील हॉटेल आणि अन्य खाद्यविक्रेत्यांमुळे वाहन पाकर्िंग रस्त्यावरच होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते. राजीव गांधी उड्डाणपुलावर ‘राजीव गांधी उड्डाणपुल' असा नामफलक लावण्यात यावा. नेरुळ, सेक्टर-२ इस्टर्न गॅलेरिया आणि सेक्टर-८ समाधान हॉटेलदरम्यान ये-जा करण्यासाठी रस्ता ओंलाडावा लागतो. येथून रहदारी जास्त असल्याने अनेकदा रस्ता ओंलाडणे महिला, शालेय मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना धोवयाचे होते.

यामुळे अपघातही घडले आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पुल  बनविण्यात यावा, आदि मागण्या सदर निवेदनातून रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवतांकडे केल्या आहेत. दरम्यान, नेरूळ नोडमधील सदर नागरी समस्यांचे तातडीने निवारण करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन