‘गौरव यात्रा'चे ठिकठिकाणी पुष्पवृष्टीद्वारे स्वागत

पनवेल मध्ये सावरकर गौरव यात्रा उत्साहात

पनवेल ः पनवेल परिसरात ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ९ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. खारघरच्या लिटिल मॉलपासून संध्याकाळी ४.३० वाजता शेकडो दुचाकीस्वारांच्या या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत एका सजवलेल्या रथावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा होती. दुसऱ्या रथावर अंदमान तुरुंगाचा दरवाजा आणि त्याच्यासमोर बसलेले स्वातंत्र्यवीर असा देखावा होता. मार्गात ठिकठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने ‘सावरकर गौरव यात्रा'चे स्वागत करण्यात आले. अल्पसंख्याक महिला आणि युवा कार्यकर्त्यांनी या गौरव यात्रेवर पुष्पवृष्टी केली.

या ‘गौरव यात्रा'मध्ये ‘भाजपा'चे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, चिटणीस विक्रांत पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, शिवसेनेचे  शहर संघटक अभिजीत साखरे, मंदा जंगले, सुलक्षणा जगदाळे, आरपीआय आठवले गटाचे किशोर गायकवाड, माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनाचे सदस्य, सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौरव यात्रा खारघर नंतर कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल अशी फिरुन रात्री ९.३०च्या सुमारास पनवेल मधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आली. याठिकाणी ढोल ताशाच्या गजरात यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. आ. प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन आ. प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

इंटकमुळे एनएमएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला कोव्हीड भत्ता